शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

नर्सीत कोट्यवधींची कामे

By admin | Published: September 07, 2014 11:51 PM

भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांचा जन्म झाल्याने या गावास विशेष महत्त्व आहे.

भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेवहिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांचा जन्म झाल्याने या गावास विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पंजाबच्या शीख बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्धी असलेल्या नर्सीत जगभरातील भाविकांच्या आर्थिक मदतीने २० वर्षांत कोट्यवधीचे कामे पूर्ण झाली आहेत.भागवत धर्माची पताका घेवून पायी प्रवास करीत समतेचा संदेश देणाऱ्या नामदेवाच्या जन्मस्थानी व कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घोमाण येथे कोट्यवधी रुपयांची कामे पूर्णत्वास गेलेली आहेत. शीख धर्मियांच्या पवित्र ग्रंथ असलेल्या गुरू ग्रंथसाहिबमध्ये संत नामदेवाचे ६५ अंभगाचा समावेश आहे. ७०० वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी पंजाबमधील खेडोपाडी पायी फिरून ज्ञानदानाचे मोलाचे कार्य केले. त्यांचे उपकार समजून घुमान पंजाब येथे ९ मजली उंच असा गुरूद्वारा बांधला व इतर मंदिर बांधकाम अगदी कुशलतापूर्वक झाले. १९९५ साली लुधियाना येथील संत नामदेव चारेटेबल ट्रस्ट यांनी संत नामदेव महाराज यांचे जन्मगावी चांगली व्यवस्था व्हावी, म्हणून गावालगत ७ एकर जमीन खरेदी केली. बांधकाम सुरू केले. जगभरात हा संदेश त्यांनी पोहोचविला व भाविकांचे हजारो हातांनी देणग्या येण्यास सुरूवात झाली. देशभरातून येणाऱ्या भाविकांना सकाळी नाश्ता, जेवण अशी व्यवस्था व रात्रंदिवस सुरूच आहे. आतापर्यंत २५ ते ३० कोटींपर्यंतची कामे पूर्ण झाल्याचेही सांगण्यात आले. संत नामदेव जन्मस्थानावर सध्या दोन मजली इमारत बांधकाम झाले. त्या कामात वाढ होऊन लवकरची ही इमारत सात मजली होणार आहे. विकासकामासाठी जगभरातून अमेरिका, पंजाब, नांदेड येथून मिळालेल्या भाविकांच्या मदतीने हे काम करू शकलोत. - डॉ. हरचंदसिंग, सचिव, संत नामदेव बाबा चॅरिटेबल ट्रस्ट लुधियाना, ह.मु. नर्सी नामदेव.शासनाची या गावांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने कोट्यवधीचा निधी दिला. त्यास भाविकांनीही दानपेटीतून भरभरून देणग्या दिल्या. मात्र विकासकाम योग्य पद्धतीने झालेच नसल्याने आमच्या मनाला समाधान लाभत नाही. या कामाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. आमचे येथे येणाऱ्या सेवाधारी भक्तांकडूनच ही सर्व कामे झाली आहेत. सध्या बलविंदरसिंग, गुरूदेवसिंग (गोविंदगड पंजाब), मोहनसिंग (दिल्ली), दयालसिंग, जिसमेलसिंग, गुरूदेवसिंग (लुधियाना) हे काम करीत आहेत. येणाऱ्या भाविकांची सेवा करण्यात आम्हाला देवप्राप्तीचा आनंद मिळत आहे.