बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत वीस गावांसाठी मंजूर पाणीपुरवठा योजनांपैकी केवळ सहाच गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित १२ गावांमधील कामे निर्धारित मुदत उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशालाचा हारताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे या कामांवर आतापर्यंत ४ कोटी १५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.ग्रामीण भागात नागरिकांना मूलबल व स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून २०१३ पासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेची कामे मंजूर झाली आहेत. या कामांवर १२ कोटी ९६ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. पैकी काही गावांमधील कामे २०१४ मध्ये सुरू झालेली असताना तीन वर्षे उलटूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या गावांमधील पाण्याची समस्या अद्याप कायम आहे. केवळ सहा गावांमधील पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली असून, या कामांवर अद्याप चार कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. अपूर्ण असलेली कामे आता वर्ष २०१६-१८ च्या कृती आराखड्यामध्ये घेण्यात आली आहेत. अपूर्ण कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अद्याप अर्धवटच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:44 AM