लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ‘शेतकरी कुटुंबियांच्या सामर्थ्यनिर्मितीतून शेतकरी आत्महत्येच्या बाबींची मीमांसा’ या प्रकल्पांतर्गत स्वयंसेवकांसाठी २९ जून रोजी वनामकृवि विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय आणि राष्ट्रीय कृषी विज्ञान निधी यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती़ कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षणचे विभागप्रमुख डॉ़ आऱडी़ अहिरे, डॉ़ जे़व्ही़ ऐकाळे, डॉ़ पी़एस कापसे, डॉ़ एम़व्ही़ कुलकर्णी आदींची उपस्थिती होती़ या कार्यशाळेत पतियाला येथील पंजाब विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधन छात्र डॉ़ अमनदीप सिंग यांनी ‘तणावग्रस्त शेतकऱ्यांचे मानसशास्त्र’ या विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले़ कार्यशाळेत डॉ़ आऱ डी़ अहिरे यांनी ‘शेतकरी आत्महत्या आणि कारणे’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ ही कार्यशाळा प्रकल्प प्राचार्य डॉ़ डी़एऩ गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली़ या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवकांच्या सामर्थ्य निर्मितीवर भर देण्यात येणार असून, तणावग्रस्त शेतकऱ्यांचा संशोधनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे़ यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतून स्वयंसेवकांची निवड करून त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे़ यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली़ तसेच मान्यवरांनी शेतकरी आत्महत्येच्या बाबींची मीमांसा यावर चर्चा केली़ या कार्यशाळेत कृषी पदवीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला़ डॉ़ पी़एस़ कापसे यांनी सूत्रसंचालन केले़ तर डॉ़ जी़बी़ अडसूळ यांनी आभार मानले़ यशस्वीतेसाठी चंद्रशेखर नखाते, खताळ, वैजनाथ दुधारे यांच्यासह वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न केले़
शेतकरी आत्महत्येवरील विचारमंथनासाठी कार्यशाळा
By admin | Published: July 01, 2017 11:44 PM