शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’

By संतोष हिरेमठ | Updated: June 17, 2024 13:06 IST

नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्वेकडील मिनारचा मोठा भाग कोसळला होता. अशीच घटना शनिवारीही घडली. 

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध बीबी का मकबऱ्याच्या संवर्धनाच्या योजनेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली आहेत. येथील चारही मिनारचे, तर अगदी ‘तीन तेरा’ वाजले आहेत. ‘दख्खनचा ताज’, ‘मिनी ताज’ अशी ओळख असलेला हा मकबरा आणि मिनार कोसळण्याचीच वाट पाहिली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

बीबी का मकबऱ्यावर  पर्यटकांच्या गर्दीचा, प्रदूषणाचा आणि तिन्ही ऋतूंचा काही परिणाम होत आहे का, याचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला. या अभ्यासाअंती मकबऱ्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने उपाययोजनांसाठी पाऊल उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संरक्षणाचे पाऊल हे कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्वेकडील मिनारचा मोठा भाग कोसळला होता. अशीच घटना शनिवारीही घडली. 

काय आहे योजना? चारही मिनारचे टप्प्याटप्प्यात संवर्धन केले जाणार आहे. मिनारच्या प्लास्टरसाठी चुन्यासह गूळ डिंक, उडीद डाळ, विटांची पावडर वापरण्याचे नियोजन आहे. मात्र, मंजुरी, निधी, काम करणारी एजन्सी निश्चित होणे यातच दोन वर्षे लोटली.  

 काय आहे स्थिती?मुख्य मकबऱ्यासह चारही मिनारची जागोजागी पडझड झाली आहे. प्लास्टर निखळले आहे. जागोजागी भेगा पडल्या आहेत. नक्षीकामही जागोजागी उखडून गेले आहे. जागोजागी मकबरा काळवंडला आहे.

‘ताजमहाल’च्या धर्तीवर हवी योजनाभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने आग्रा येथील ताजमहालच्या पृष्ठभागाचे साचलेल्या प्रदूषकांपासून संरक्षण करण्यासाठी वैज्ञानिक स्वच्छता आणि संवर्धन योजना तयार केली. अशीच योजना बीबी का मकबऱ्याच्या संवर्धनासाठी राबविण्याची गरज आहे. 

बीबी का मकबऱ्याचे टप्प्याटप्प्यात संवर्धन करण्यात येईल. आधी दोन मिनारचे काम केले जाईल. पर्यटकांची ये-जा सुरू ठेवून हे काम करावे लागेल. - डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

टॅग्स :Bibi-ka-Maqbaraबीबी का मकबरा