शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
3
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
4
Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!
5
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
6
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
7
अपेक्षाच अपेक्षा! "२.५ कोटी पगार अन्..."; तरुणीची लग्नासाठीची हटके लिस्ट पाहून नेटकरी शॉक
8
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
9
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
10
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
11
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
12
सुप्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत झालेला फरार, नेमकं प्रकरण काय?
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
14
तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो
15
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
16
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
17
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
19
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
20
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका

जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 08:50 IST

... आणि ‘पान’ पोरके झाले !

- धनंजय कुलकर्णी

छ्त्रपती संभाजीनगर : कधी कोणी विड्याचे पान रडताना पाहिलेय का? नाही न? ते तर आपली जिभ रंगवत असते. पण, हे पान मात्र गुरुवारी ढसाढसा रडले. का माहितीये, त्याला देशभर मोठी प्रसिद्धी मिळवून देणारे हात आज शांत झाले. रोज प्रेमाने त्याच्यावर हात बोट फिरवणारे हात अचानक थांबले होते. काथ, चुना, बेळगाव चटणीपासून ते चॉकलेट फ्लेवरपर्यंत सर्वच काही छोट्यामोठ्या रसदार पदार्थांच्या प्रेमाचा वर्षाव आता त्याच्यावर होणार नव्हता. गुरुवारी तारा पानचे सर्वेसर्वा शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन झाले. ‘ते’ पान सांगत होते ‘मला जगभर प्रसिद्धी मिळवून देणारे हात थांबल्यामुळे मी आज पोरका झालोय. शरफूभाईंचा ‘तो मिडास टच’ आता मला लाभणार नाहीये. ‘लिगसी’ काय असते ती मी एक पान म्हणून अनुभवली आहे, पाहिली आहे. अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या पानटपरीच्या व्यवसायाला जगभरात प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या शरफूभाईंच्या प्रेमात मी होतो अन् पुन्हा ढसाढसा ते पान रडू लागले. हुंदके देत हळूहळू भूतकाळात रमले व शरफूभाईंची कहाणीच सांगू लागले.

ते म्हणाले, शरफूभाईंच्या मेहनतीने मला त्यांनी एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. परंपरा वेगळी होती. ते पान म्हणाले, मला सजवताना विशेष कस्तुरी (किंमत रु. ७० लाख किलो), केशर (किंमत रु. २ लाख किलो), गुलाबाचा अर्क (किंमत रु. ८००००, किलो), एक विशेष द्रव सुगंध आणि एक सुपर सिक्रेट घटक वापरत. रात्रीच्या जेवणानंतर रोज हजारो लोक अगदी महिलादेखील मला घेण्यासाठी तारावर येतात. कारण, मला सजवताना स्वादिष्ट चव आणि विविधतेमुळे.

ते पान पुढे म्हणाले, शरफुद्दीन सिद्दिकी यांनी १९६८ मध्ये एका छोट्याशा दुकानातून सुरुवात केली. भाईंचे चित्रपटात काम करण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी ते मुंबईला गेले, पण त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर ते शहरात परतले आणि त्यांच्या आईच्या सल्ल्यानुसार त्यांनी तारा पान सेंटर सुरू केले. पान सेंटरसाठी पैसे देण्यासाठी तिने सोन्याचे दागिने विकले. तेव्हा ५ ते १० रुपयांना एक पान ते विकत. आता काळानुरूप माझे दरही बदलले असले तरी चव मात्र कायम आहे. यामुळे शरफूभाईंकडे आजही ५ हजार ते १५ हजारांपर्यंत विविध पान अर्थात चवीनुसार मिळते. म्हणूनच आज आम्हाला अभिमान आहे की, आमची चव चाखण्यासाठी शहरात जगभरातून मागणी असते. अनेक सिनेस्टार, विविध राजकीय पक्षांतील नेते इथे येतात. शरफूभाईंच्या रूपात ‘तारा’ जरी निखळला असला तरी ही ‘परंपरा’ त्यांची मुले पुढे नेतील असे सांगत ते पान पुन्हा हुंदके देत रडू लागले, पण त्याचा पोरकेपणाचा भाव लपला नाही.

शहरातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व, सामाजिक कार्यात कायम अग्रेसर उस्मानपुरा येथील तारा पान सेंटरचे मालक शरफोद्दीन सिद्दिकी (वय ७४) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अन्सार, सात मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रात्री दहा वाजता उस्मानपुरा येथील जामा मशीद येथे नमाज -ए- जनाजा अदा करण्यात आली. शहानूरमियां दर्गा परिसरातील कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. दुपारी त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर धडकताच त्यांच्या निकटवर्ती आणि हितचिंतकांनी निवासस्थानी गर्दी केली होती. संध्याकाळी अंत्यसंस्कारावेळी लोकमतचे एडिटर ईन चीफ राजेंद्र दर्डा, माजी खासदार इम्तियाज जलील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, डॉ. जितेंद्र देहाडे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक