छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय श्रम मंत्रालयाने असंघटित मजुरांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (पेन्शन) योजना सुरू केली आहे. ५५ ते २०० रुपये हप्ता भरल्यानंतर वयाच्या साठीनंतर महिन्याला ३ हजार रुपये मानधन मिळणार आहे.
काय आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना?ज्या मजुरांचे महिन्याचे उत्पन्न १५ हजारांपेक्षा कमी असावे आणि तो कर भरणारा तसेच पीईएफदेखील जमा होत नसेल, अशाच व्यक्तीला लाभ होऊ शकतो. केंद्रीय श्रम मंत्रालयाने असंघटित मजुरांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणलेली आहे. या योजनेचा लाभ कामगारांनी घ्यावा, यासाठी त्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. वयाच्या साठीनंतर मिळणाऱ्या मानधन वजा पेन्शनचे हक्कदार तुम्ही होऊ शकता.
१८ ते ४० वयोगटातील मजुरांसाठीमजूर १८ ते ४० वर्षांचा असावा, तो कर, कामगार विमा सेवा योजना लाभार्थी नसावा. महिन्याचे उत्पन्न १५ हजारांपेक्षा कमी असावे. कितीही काम केले तरी त्या मजुराला पंधरा हजारांच्या वर उत्पन्न जात नाही.
५५ ते २०० रुपये हप्ता५५ ते २०० रुपये त्याने भरून दिले पाहिजे, एक-दोन हप्ता भरेल आणि नंतर भरणार नाही, अशा लोकांना त्याचा फायदा मिळणार नाही.
असंघटित कामगारांसाठी साठीनंतर महिन्याला तीन हजारांची पेन्शनवृत्तपत्र वितरक, धोबी, टेलर्स, माळी, चप्पल बूट पाॅलीश, शिवणकाम, केस कर्तनालयात काम, रिक्षाचालक, घरेलू कामगार, कचरा वेचक, हातगाडीवर भाजीपाला विकणारे, पान ठेवा, फळ, फूल विक्रेता, चहा, चाट ठेला, फूटपाथ व्यापारी, हमाल, कुली, जनरेटर-लाइट लावणारा कामगार, केटरिंग, फेरीवाले, मोटारसायकल तसेच सायकल दुरुस्ती करणारा, गॅरेज कामगार, सफाई कामगार, ढोल-बाजा, टेंट हाऊस, टांगा व बैलगाडीचालक, अगरबत्ती, घरेलू उद्योगात कामगार, चन्ने, मुरमुरे, फुटाणे भाजणे विक्री, गाडीवान, पशुपालन, मासे, कोंबड्या पालन कर्मचारी, दुकानात काम करणारे, शेतमजूर, दूध विक्री करणारे मजूर असे कामगार त्यांना ईएसआय, पीएफचा लाभ न मिळणाऱ्या सर्व मजुरांना ६० वर्षांनंतर महिन्याला मानधन पेन्शन मिळेल.
अर्ज कोठे करणार?सेतू सुविधा केंद्र अथवा मोबाइलवरही ऑनलाइन अर्ज करण्याची गरज आहे.
अर्ज भरणे सुरूकेंद्रीय श्रम मंत्रालयाने असंघटित मजुरांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असून, अर्ज भरणे सुरू आहे. त्याचा लाभ घ्यावा.-युवराज पडियाल, सहायक कामगार उपायुक्त