शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

ऐतिहासिक स्मारकांवर पूजा; अधिनियम काय आहे? इतिहासतज्ज्ञ काय म्हणाले?

By संतोष हिरेमठ | Published: July 01, 2024 3:14 PM

ज्या ठिकाणी परवानगी आहे, तेथेच पूजा करता येते.

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत काही भाविकांनी केलेले कीर्तन, भजन आणि देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यातील भारतमाता मंदिरात पूजेला नाकारलेल्या परवानगीचा मुद्दा गेला आठवडाभर चांगलाच चर्चेत राहिला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने यासाठी कायदा पुढे केला. मात्र, राजकीय रेट्यामुळे त्यांना एक पाऊल मागे यावे लागले. या सगळ्यासंदर्भात इतिहासतज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले.

काय आहे अधिनियम?‘नाॅन लिव्हिंग’ श्रेणीतील स्मारकांवरील मंदिरात पूजा, अर्चा करणे हे स्मारक आणि पुरातत्त्व स्थळ आणि अवशेष अधिनियम १९५८ आणि नियम १९५९ चे उल्लंघन मानले जाते.

धोरण बदलण्याचा विचार'नॉन लिव्हिंग' स्मारके म्हणजे जिथे पूजा किंवा विधी केले जात नाहीत, तर 'लिव्हिंग' स्मारके म्हणजे जिथे सक्रिय धार्मिक पूजा आणि विधी होतात. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) नियमांनुसार जिथे स्मारके ताब्यात असताना धार्मिक कार्ये सुरू होती, केवळ त्या स्मारकांनाच ती सुरू ठेवण्याची परवानगी होती. उदाहरणार्थ कार्ले लेणी येथे एकवीरा देवीची धार्मिक पूजा चालू होती. जेव्हा 'एएसआय'ने तिचा ताबा घेतला, तेव्हापासून अजूनही चालू आहे; परंतु ताज्या माहितीनुसार 'एएसआय' धार्मिक महत्त्व असलेल्या संरक्षित स्मारकांमध्ये पूजेला परवानगी देऊन आपले धोरण बदलण्याचा विचार करत आहे.- डॉ. दुलारी कुरेशी, इतिहासतज्ज्ञ

पुरातत्त्वीय कायद्यातील तरतुदीचे पालन व्हावेजी स्मारके ‘लिव्हिंग’ या श्रेणीत आहेत, तेथे पूजाअर्चा करता येते. मात्र, ‘नाॅन लिव्हिंग’ स्मारकांवर कायद्यानुसार पूजा करण्यास परवानगी नाही. या कायद्याचे पालन केले पाहिजे.- डाॅ. कामाजी डक, पुरातत्त्व अभ्यासक

स्मारके जपावीप्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष कायद्यानुसार बेकायदेशीर धार्मिक विधी करता येत नाही. ज्या ठिकाणी परवानगी आहे, तेथेच पूजा करता येते. जेथे परवानगी नाही तेथे पूजा करता येत नाही. प्राचीन स्मारके ही जपली जावी.- डॉ. संजय पाईकराव, सचिव, मूर्ती व शिल्प संशोधन संस्था, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण