शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
2
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
3
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
4
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
5
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
6
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
7
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
8
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
9
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
10
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
11
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
12
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
13
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
14
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
15
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
16
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
18
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात फजिती! फक्त ७ ओव्हर्सची मॅच; त्यातही पाकनं गमावल्या ९ विकेट्स
19
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
20
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा

व्वा! छत्रपती संभाजीनगरहून पुण्यापाठोपाठ जालना, बीडचाही प्रवास होणार ई-बसने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 7:20 PM

ऑक्टोबरमध्ये येणार ७४ ई-बस : ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला ‘स्पीड’

छत्रपती संभाजीनगर : पुणे मार्गावर सध्या ई-बस धावत आहेत. लवकरच जालना, बीडसह इतर मार्गांवर ई-बस धावताना दिसतील. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला २१४ ई-बस मिळणार असून, यात पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये ७४ ई-बस दाखल होतील. यासाठी जिल्ह्यातील ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला गती देण्यात येत आहे.

राज्यभरात ५ हजार ई-बस टप्प्याटप्प्यात दाखल होत होत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाला दिवाळीपूर्वी ७४ ई-बस मिळण्याची शक्यता आहे. या बसच्या दृष्टीने सिडको बसस्थानकासाठी चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेच्या परिसरात चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. त्याबरोबरच पैठण, सिल्लोड, वैजापूर येथेही चार्जिंग स्टेशनचे काम सध्या सुरू आहे. लवकरच कन्नड आणि गंगापूर येथील चार्जिंग स्टेशनचे काम सुरू होणार आहे.

एकाच वेळी २८ बसचे चार्जिंगएकाच वेळी २८ बसचे चार्जिंग होईल, अशी सुविधा चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेच्या परिसरात होत आहे. एकदा चार्ज झाल्यानंतर जवळपास ३०० किमी अंतर ई-बस धावेल.

सध्या किती ई-बस?विभागात सध्या ५ ई-बस आहेत. या ५ बसेस आणि पुणे विभागाच्या ५ अशा एकूण १० बसेस छत्रपती संभाजीनगर-पुणे मार्गावर धावत आहेत. लवकरच ई-बसची संख्या वाढेल.

८० टक्के काम पूर्णचार्जिंग स्टेशनसाठी ८० टक्के सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे. केबलचेही काम झालेले आहे. चार्जिंग स्टेशनचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. ऑक्टोबरमध्ये ई-बसेस दाखल होण्याची शक्यता आहे.- पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAurangabadऔरंगाबादstate transportएसटी