छत्रपती संभाजीनगर: अजिंठा- वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त शहरात आलेले ख्यातनाम सिने गीतकार जावेद अख्तर यांनी गुरूवारी दुपारी वेरूळ लेण्यांना भेट दिली. या लेण्या पाहुन जावेद अख्तर भारावून गेले. अदभूत वेरूळ लेण्या पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी येथे वारंवार यावे लागेल आणि चार ते पाच दिवसांच्या मुक्काम करावा लागेल, असे त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या गाईड आणि अन्य मंडळींना सांगितले.
छत्रपती संभाजीनगर शहरात कालपासून अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. गुरूवारी दुपारी त्यांनी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर.बाल्की आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि एनएफडीसीच्या वरीष्ठ अधिकारी गौरी नायर होते. टुरिस्ट गाईड विवेक पाठक आणि इतिहासाचे अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी त्यांना लेण्यासंदर्भात माहिती दिली.
या लेण्या पाहात असताना त्यांनी अद्भूत वेरूळ विषयी आपण आतापर्यंत ऐकले होते. आता प्रत्यक्ष पाहात असताना हे खरेच आणि खूपच अदभत आहे. वेरूळ असे एका धावत्या भेटीमध्ये समजून घेणे शक्य नाही. वेरूळ समजून घेण्यासाठी वारंवार यावे लागेल आणि चार ते पाच दिवसांच्या मुक्काम येथे करावा लागेल. यापुढे आपण येथे चार ते पाच दिवसांच्या मुक्कासाठी येऊन या लेण्यांचे सौदर्य आणि इतिहास जाणून घेऊ, असे जावेद अख्तर यांनी त्यांच्या सोबत असलेल्या मंडळींशी बोलताना सांगितले.