शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून दीड वर्षात ७ लाखांवर प्रवाशांची हवाई सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 11:34 AM

प्रवासी संख्येत वाढ, मुंबई, दिल्लीला सर्वाधिक प्रवासी

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या दीड वर्षात तब्बल ७ लाखांवर प्रवाशांनी हवाई सफर केली आहे. यात सर्वाधिक प्रवास दिल्ली, मुंबईसाठी करण्यात आला आहे.

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६ लाख २३ हजार ९१५ प्रवाशांनी प्रवास केला, तर ५ हजार ७९९ विमान उड्डाणे नोंदवली गेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी ५० हजारांवर प्रवाशांची नोंद झाली. प्रवाशांच्या संख्येत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७ टक्के वाढ झाली आहे, तर विमान उड्डाण संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबूकस्वार यांनी दिली.

विमान प्रवाशांची संख्या (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४)शहर- प्रवासी संख्यादिल्ली-२,२१,११६मुंबई- २,४८,२०१बंगळुरू- ५४,६४६हैदराबाद- ९१, ८०८

२०२४ मधील विमान प्रवासीमहिना- प्रवासी संख्याजानेवारी - ५७,१५०फेब्रुवारी- ५२,६३६मार्च-५४,३७२एप्रिल-५०,०४०मे- ५८,३९५

प्रवासी संख्या आणखी वाढेलविमानतळाच्या आकडेवारीत वाढ झाली आहे, हे साहजिकच आहे. कोविड प्रतिबंध हटताच प्रवासी संख्या वाढतच गेली. चिकलठाणा विमानतळावर वर्षाला ३ ते ४ लाख प्रवासी संख्या असायची, ती आता २०२३ पासून ६.२५ लाखांच्या घरात गेली आहे. ही खूप मोठी वाढ आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा असूनही व आंतरराष्ट्रीय प्रवासी वगळता २०२३ मध्ये प्रवासी संख्या ६ लाख पार गेली होती. आता अहमदाबाद, लखनौ-नागपूर-गोवा विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवासी संख्या ही २०२४ अखेर ७ लाख पार करेल, अशी शक्यता आहे.- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप

पाठपुरावा सुरू आहे९ विमानांची ये-जा विमानसेवेत आणि प्रवासी संख्येत वाढ होत आहे. दिवसभरात ९ विमानांची ये-जा होत आहे. छत्रपती संभाजीनगरहून नव्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा आणि प्रयत्न सुरू आहे.- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन