शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चुकीची निविदा पद्धत; मनपावर कोटींचा भार

By admin | Published: October 08, 2016 1:08 AM

औरंगाबाद : शहरातील पाच रस्त्यांच्या कामांसाठी चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविल्याने १ कोटी ६७ लाख रुपयांचा अधिभार महापालिकेवर पडला.

औरंगाबाद : शहरातील पाच रस्त्यांच्या कामांसाठी चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविल्याने १ कोटी ६७ लाख रुपयांचा अधिभार महापालिकेवर पडला.तसेच मनपाचे आर्थिक नुकसान झाल्याचा स्पष्ट अभिप्राय त्रिसदस्यीय समितीने दिला. सर्व संबंधितांवर प्रशासकीय व विभागीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेशही समितीने दिले आहेत. मनपा आयुक्तांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले.वरील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने २४ कोटी ३३ लाख रुपयांचा विशेष निधी मनपाला दिला होता. या निधीतून होणाऱ्या ‘व्हाईट टॅपिंग’ च्या कामांचा दर्जा राखण्यासाठी समिती नेमण्यात आली. विभागीय आयुक्त अध्यक्ष, जिल्हाधिकारी सचिव आणि महापालिका आयुक्त सदस्य, असे त्रिसदस्यीय समितीचे स्वरूप होते. या निधीतून पहिल्या टप्प्यात कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, बाबा पेट्रोलपंप ते क्रांतीचौक, सेव्हन हिल ते सूतगिरणी चौक, कासलीवाल कॉर्नर ते तुकोबानगर आणि गजानन महाराज चौक ते जयभवानी चौक, अशा पाच रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. या पाच रस्त्यांच्या कामांसाठी निविदा काढण्यासाठी महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी दरपत्रक मागवले. यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र, त्यातील एक निविदा तांत्रिक कारण दाखवून नाकारण्यात आली. जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निविदा मंजूर केली. अंदाजपत्रकीय दरापेक्षा आठ टक्के अधिक दर होता. यासाठी स्थायी समितीची मान्यता घेण्यात आली. या चुकीच्या निविदा पद्धतीला नगरसेवक विकास एडके यांनी अ‍ॅड. नितीन त्रिभुवन यांच्यामार्फ त खंडपीठात आव्हान दिले. तर याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. बी. एल. सगर किल्लारीकर यांनी खंडपीठात बाजू मांडली. जीएनआय कंपनी पात्र ठरावी म्हणून कार्यकारी अभियंत्याने खोटे अनुभव प्रमाणपत्र निर्गमित केले व त्याआधारे पात्र ठरलेल्या कंपनीला ठेका देण्याचा निर्णय शहर अभियंत्याने घेतला. याचिकाकर्त्याने दिवाणी अर्ज दाखल करून १ कोटी ६७ लाख रुपयांच्या वसुलीत अडथळे येऊ नयेत यासाठी शहर अभियंता व त्यांच्या मालमत्तेवर या रकमेच्या अधिभाराची नोंद करावी, अशी मागणी केली.