लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: किनवट तालुक्यातील बोधडी शिवारात एका शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली़ यात ५ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ विशेष पथकाचे प्रमुख सपोनि ओमकांत चिंचोलकर यांना बोधडी शिवारात गजानन मुंडे यांच्या शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानंतर रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अड्ड्यावर छापा मारला़ अड्ड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंडिका विस्टा ही कार आडवी लावून तो अडविण्याचा प्रयत्न जुगाऱ्यांनी केला होता़ यावेळी एकूण ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पाठलाग करुन पकडण्यात आले़ त्यामध्ये गोपाळ मेश्राम (रा़रामनगर), विष्णू दराडे, नागेश केंद्रे, हनीफ तिगाले, गणपत गांदेलवार, संतोष वाकोडे, नंदकुमार दराडे, संतोष नेमानेवार, मोहम्मद सिराज मोहम्मद जाफर, व्यंकन्ना माडपेलीवार, उदयकुमार केंद्रे यांचा समावेश आहे़ या आरोपींकडून एक इंडिका विस्टा कार, अकरा मोबाईल आणि रोख ७५ हजार ६५० असा एकूण ५ लाख ९६ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या कारवाईत सपोनि चिंचोलकर यांच्यासोबत पोकॉ़ लाटकर, निरणे, जगताप, जिंकलवाड, कुलकर्णी, अवतारिक, गांगुलवार, पैनापल्ले, खंदारे, वानखेडे, देवकते यांचा समावेश होता़ याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास सपोनि रामेश्वर कायंदे करीत आहेत़
बोधडी येथे जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:33 AM