वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचा देव यात्रेस मंगळवार पासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्त शुक्रवारी रात्री ९ वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे. यात्रा महोत्सवात चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील चक्रधरस्वामींचे भव्य मंदिर संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. महानुभाव पंथाचे तीर्थस्थान म्हणून जाळीचा देव हे स्थान आहे. यात्रेला संपूर्ण महानुभाव पंथाचे भक्त येतात. दिल्ली, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्रासह विविध राज्यातून महानुभाव या यात्रेस दरवर्षी येतात. जालना, बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्याच्या सीमेवर जाळीचा देव आहे. निसर्गरम्य ठिकाणी डोंगर माथ्यावर चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. या पंथाचे सुमारे ६ आश्रम आहेत. यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. (वार्ताहर)
जाळीचा देव यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ
By admin | Published: February 05, 2017 11:34 PM