करमाड : या वर्षी कोरोनाचे सावट पोळा सणावर ही पडले आहे. यामुळे बहुतांश गावात ग्रामस्थांनी सध्या पद्धतीने पोळा साजरा करत मिरवणूक न काढताच बैलांचे पूजन केले.
कोरोना प्रभावामुळे सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. यासोबतच सण, उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास मनाई आहे. शेतकऱ्यांच्या सर्वात प्रिय पोळा सणावर सुद्धा कोरोनाचे सावट उमटले आहे. इतिहास पहिल्यांदाच मोठी मिरवणूक न काढता बैलांचे पूजन करून बळीराजाने पोळा सण साजरा केला. बैलांची सजावट करून गावच्या मारुती मंदिरासमोर आणून मिरवणूक न काढता सरळ घरी पूजन करण्यासाठी नेण्यात आले. अशा पध्दतीने पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन अत्यंत साध्या पद्धतीने खेडोपाडी पोळा साजरा करण्यात आला.