शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील सर्व गावांतील जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून १३ गावांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे़ या तेराही गावांना जलस्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्यात ४३ ग्रामपंचायती असून, आरोग्य विभागामार्फत प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेकउे पाठविले जातात़ प्रयोगशाळेत प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासून त्याचे तीन स्तरात वर्गीकरण करून लाल, हिरवे आणि पिवळे कार्ड देऊन विशेष सूचना देण्यात येतात़ जुलैअखेर तालुक्यातील सर्वच गावांचे पाणी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते़ त्यानुसार ३० ग्रामपंचायतीस हिरवे कार्ड देण्यात आले आहे़ लाल कार्ड एकाही ग्रामपंचायतीस मिळाले नसले तरी १३ ग्रामपंचायतीस पिवळे कार्ड देण्यात येऊन दोष दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्याचबरोबर गटारीसुद्धा स्वच्छ करावे, असे सुचित करण्यात आले आहे़
१३ गावांना पिवळे कार्ड
By admin | Published: August 11, 2014 12:46 AM