शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पहिल्या दिवशी २२ % विद्यार्थ्यांचे 'येस सर'; औरंगाबाद ग्रामीणमध्ये 406 शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:04 PM

वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला.

ठळक मुद्देतपासणीअभावी १७९ शाळा बंदचशहरालगतच्या गावांत शाळा सुरु करण्यास विरोध 

औरंगाबाद : जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या ५८५ पैकी ४०६ शाळा सोमवारी सुरू झाल्या. पहिल्या दिवशी १७ हजार २७५  म्हणजे २२ टक्के विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत आले. १७९ शाळा विविध कारणांनी सोमवारी सुरू होऊ शकल्या नाहीत. 

राज्य शासनाने दिलेले आदेश व जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नववी ते बारावीचे ग्रामीण भागातील वर्ग सुरु झाले. जिल्हा परिषदेच्या ५५ माध्यमिक शाळा आहेत. तर ५३५ शाळा या संस्थांच्या आहेत. यातील तपासणी झालेल्या शिक्षकांचे अहवाल सोमवारपर्यंत उपलब्ध झाले नव्हते. शिक्षणविभागाकडून त्यांना रिपोर्ट येईपर्यंत शाळेत उपस्थित होऊ नये अशा सूचना दिल्या होत्या. मंगळवारपर्यंत बहुतांश अहवाल मिळतील. त्यानंतर शिक्षक हजर होऊन सुरु न झालेल्या शाळाही सुरु होतील. तर सुमारे ७०० शिक्षकांनी अद्याप तपासणी करुन घेतली नाही. त्यांनीही तात्काळ तपासणी करुन शाळेत हजर व्हावे असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी केले. 

शहरालगतच्या गावांत शाळा सुरु करण्यास विरोध वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला. मात्र, जिल्हाधिकारी यांच्याकडून अद्याप त्या शाळासंदर्भात कोणतेही स्वतंत्र आदेश नाही, असेही डाॅ. चव्हाण यांनी सांगितले. 

शहरात ३०, तर ग्रामीणमध्ये ७० टक्के खाजगी शिकवण्या सुरू केल्याचा दावाशहरातील ३० टक्के, तर ग्रामीणमधील ७० टक्क्यांपेक्षा अधिक खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस सोमवारपासून सुरू केल्याची माहिती कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी दिली. आई, वडील, विद्यार्थ्यांचे हमीपत्र, आरोग्य अधिकाऱ्यांचे  प्रमाणपत्र, शासनाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन यात केले असून पुढील दोन- तीन दिवसांत बहुतांश क्लासेस सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या ८ महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने त्यावर उदरनिर्वाह असणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. शाळांप्रमाणे क्लासेसही सुरू करावेत अन्यथा आत्मदहनाचा इशारा संघटनांनी दिला होता. त्यासाठी आंदोलनेही केली, तरीदेखील शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने अखेर क्लासेस चालकांनी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरू झालेल्या क्लासेसमध्ये प्रामुख्याने दहावी व बारावीच्या क्लासेसचा समावेश आहे. राज्यभरात ५० टक्के क्लासेस सुरू झाल्याचे मांडकीकर यांनी कळविले आहे.  खाजगी शिक्षकांनीही तपासण्या करून घेऊन ज्ञानदान सुरू केल्याचा दावा त्यांनी केला.  लवकरच शाळा, महाविद्यालयांप्रमाणे कोचिंग क्लासेस सुरू करण्यासंदर्भात सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणीही कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे करण्यात आली.

शहरात ५९८ शिक्षकांची कोरोना टेस्टशहरातील माध्यमिक विभागाच्या शाळा ३ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, शिक्षकांना शा‌ळेत जाणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी सक्तीची केली आहे. सोमवारी ५९८ शिक्षकांची तपासणी करण्यात आली. रविवारी २९८ शिक्षकांची तपासणी झाली होती. त्यामध्ये १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले.  आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थी