शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

'तुम्ही मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईत घालवता....';वाचा आ. शिरसाटांना शिवसैनिकाचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 5:48 PM

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे आ. संजय शिरसाट यांच्यावर प्रश्नांची सरबती करून जाब विचारला आहे.

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनास खरमरीत पत्राद्वारे प्रतिउत्तर देणाऱ्या शिंदेगटातील आमदार संजय शिरसाट यांना आता सामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याच औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे आ. शिरसाट यांच्यावर प्रश्नांची सरबती करून जाब विचारला आहे. 'मुख्यमंत्री भेटत नाहीत असे म्हणता, तुम्ही तर मतदारांना न भेटता अनेक 'रात्री' मुंबईत घालवता याची कल्पना सर्वांना आहे. तुमचे अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले आहेत, अशी आठवण करून देत येत्या निवडणुकीत बोलू, असा इशाराच शिवसैनिकाने आ. शिरसाट यांना दिला. हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. 

राज्यातील राजकीय तिढा आता वेगळ्या वळणावर गेला असून उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता आणि पक्ष दोन्ही जातील अशी शक्यता निर्माण  झाली आहे. निर्णायक परिस्थितीत पुन्हा बंडखोरांशी जुळवून घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सोशल मिडीयावर संवाद साधत भावनिक साद घातली. बंडखोरांतील एक असलेल्या औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना बंडखोरी का करावी लागली याची कारणे सांगितली. मुख्यमंत्र्यांनी भेट होत नव्हती, आमच्या जीवावर मोठे झालेले बडवे आम्हाला भेटू देत नव्हते, अशी अनेक कारणे त्यांनी पत्रात दिली आहेत. यावर सामान्य शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. एका शिवसैनिकाने तर आ. संजय शिरसाट यांना जाब विचारणारे पत्रच लिहिले आहे. ''आमच्या जीवावर निवडून आला आहात तर आमच्याही भावना ऐकून घ्या. तुम्ही आमच्यासाठी शिवसेनेने दाखवलेला दगड आहात. केवळ शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाच्या जिव्हाळ्यामुळे तुम्हाला आम्ही मत देतो. एक रिक्षावाला असतानाही तीन वेळा आमदार झालात.  मुलाला नगसेवक म्हणून आमच्यावर लादले. मागच्या निवडणुकीत तुम्हाला विजयाची आशा नव्हती. मात्र शिवसैनिकांमुळे निवडून आलता. आता तुम्ही बंडखोरीचे कारण मुख्यमंत्री भेटत नाहीत दिले. तुम्ही तर मतदारांना न भेटता अनेक "रात्री" मुंबईत घालवता, याची कल्पना सर्वांना आहे. तुमचे अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले आहेत. बोलण्यासारखे खूप आहे. येत्या निवडणुकीत बोलू.'' असा इशाराही पत्राद्वारे आ. शिरसाटांना या शिवसैनिकांनी दिला आहे. 

वाचा व्हायरल पत्र जशासतसे: प्रिय,संजय शिरसाट जी...शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण लिहिलेल्या पत्राबाबत आपल्याच मतदार संघातील एका शिवसैनिकाच्या भावना..आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्या आधी रिक्षा चालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेऊन आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि आपण सर्वसाधारण रिक्षावालापासून ३ वेळेस आमदार झालात.शिरसाट जी हेच नाही तर आपण आपल्या मुलालाही आमची इच्छा नसताना आमच्यावर लादले त्याचा भयानक त्रास सहन करूनही आम्ही मेहेनत करून जनतेच्या साथीने त्यालाही लायकी नसताना निवडणूक दिले.हे सगळं फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमाखातर...संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड...याचा प्रत्यय तुम्हाला २०१९ सालच्या निवडणुकीत आला आहे.संजय शिरसाट या नावाला जनतेचा प्रचंड विरोध होता. जनतेचाच काय तुमच्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी सुद्धा आपली साथ सोडली होती.त्यासाठी पण अनेक कारणं होती. जेव्हा तुमच्या विरोधात सगळे उभे होते आता तुम्ही ज्यांच्या सोबत So called हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत जाणार आहात त्या भाजपने राजू शिंदे नावाचा भाजपचा माजी उपमहापौर आपल्या विरोधात उभा केला देवेंद्र फडणवीस स्वतः राजू शिंदेच्या संपर्कात होते.पैशांचा मोठा बाजार झाला अनेक दिग्गज मंडळीनी आपल्याला पाडण्यासाठी कंबर कसली होती.तुमच्याच जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आपणही निवडणूक काळात अनेक वेळा "रात्रीच्या" वेळी रडलात, हतबल झालात!अगदी निकालाच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही विजयाची आशा सोडली होती.पण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेला चमत्कार आपल्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक होता याचे आम्ही सगळे शिवसैनिक साक्षीदार आहोत.तो सर्व चमत्कार फक्त आणि फक्त आपल्याला शिवसेनेचा दगड समजून केलेल्या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे.शिवाजीनगर, पदमपुरा अशा अनेक भागातून आपल्याला लीड मिळालेली मत ही शिवसेनेची होती; संजय शिरसाटची नाही, हे संभाजीनगर पश्चिममधील प्रत्येक मतदार, शिवसैनिक सांगू शकतो.असो बोलण्यासारखं खूप काही आहे...तुम्ही उद्धवसाहेब भेटत नाही म्हणता. काल त्यांनी, ते का भेटत नव्हते हे सांगितले.तुम्ही मतदारांना न भेटता अनेक "रात्री" मुंबईला कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे..आपले अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले फक्त आणि फक्त शिवसेनेच्या आपुलकी पोटी.आमच्या जीवावर तुम्ही निवडून आलात.तर अमाच्याही भावना ऐकून घ्या.आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या सोबत आहोत आणि सदैव राहणार...अजून जे काही मनात आहे ते येणाऱ्या निवडणुकीत बोलू.लोभ असावा...शिवसैनिक पदमपुरा,संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ