शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

संशोधन करायचे? गाईडला २५ हजार द्या; विद्यार्थिनी-प्राध्यापिकेतील धक्कादायक संवाद व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 2:24 PM

विद्यार्थिनीने केली कुलगुरू, पोलिसांकडे तक्रार; विद्यार्थी संघटनांकडून कारवाईची मागणी

औरंगाबाद - एक प्राध्यापिका संशोधक विद्यार्थिनीला प्रति विद्यार्थी २५ हजार आता आणि तेवढेच पैसे व्हायवाच्या वेळी गाईडला द्यावे लागतील, असे म्हणून, पैसे आणून देण्याची मागणी करत असल्याची ऑडीओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली. ही संवादाची क्लिप ‘लोकमत’च्या हाती लागली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुखाकडून गाईडसाठी संशोधक विद्यार्थिनीकडे ५० हजारांची लाच मागण्यात आली. एनएसयुआयच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची बुधवारी भेट घेऊन, त्या प्राध्यापिका व गाईडवर कारवाईची मागणी केली. संशोधक विद्यार्थिनीने विद्यार्थी संघटनांना सोबत घेऊन बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. अधिसभा सदस्य विजय सुबुकडे, एनएसयुआयच्या दीक्षा पवार, मृणालिनी देशपांडे, जयश्री शिर्के, श्रद्धा खरात, अलकेश कोरखे, लोकेश कांबळे, अमोल खरात, अंजली घनबहादूर यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

असे काही घडले नाही असा कोणताही प्रकार घडलेला नाही. त्याचा पुरावाही काही नाही. मी गाईड नाही. विभागप्रमुख आहे. माझा संबंधच कुठे येत नाही. मी प्रतिक्रिया काय देऊ? मी गाईड नसताना माझा काही संबंध नसताना ती विद्यार्थिनी असे का करते आहे, त्याबद्दल मला काहीही माहीत नाही.- डॉ. उज्ज्वला भडंगे, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

पहिले संभाषण...विद्यार्थिनी - मॅडम, वहिनी सांगत होत्या तुमचा फोन आला होता.प्राध्यापिका - हो, तुम्ही या लवकर.विद्यार्थिनी - २५ हजार एकदम नाही जमणार, २५ हजार दोघींचे आहेत का?प्राध्यापिका - नाही, दोघींचे स्वतंत्र,विद्यार्थिनी - ही फी आहे का? पैसे काढायला भावाला सांगावे लागेल. कशाचे आहेत ते?प्राध्यापिका - सगळं फोनवर नाही बोलता येणार, व्हाॅटस् ॲप काॅल कर..............दुसरे संभाषण...प्राध्यापिका - अंजली, सरांचा (गाईड) मला काॅल आला होता. तुम्ही त्यांच्याशी बोललात म्हणे.विद्यार्थिनी - हो मॅम.प्राध्यापिका - तुम्ही तिकडे गेलात, मला सांगितले नाही तुम्ही?विद्यार्थिनी - नाही, मॅम. तुम्ही म्हटले तुम्हाला खूप प्रेशर आले. म्हणून मी त्यांना भेटण्यासंदर्भात बोलले.प्राध्यापिका - सर मला म्हणाले, तुम्ही विद्यार्थिनींना थेट का म्हटले.विद्यार्थिनी - मॅम हे चुकीचे आहे. त्यांनी तुम्हाला यात ओढायला नको होते.प्राध्यापिका - बेटा या लाईनमध्ये असे होते. सर मला म्हणाले, आता बघा मी काय करतो. मी त्यांना म्हटले, असं काही करू नका. तुम्ही माझ्याबद्दलही त्या सरांजवळ चुकीचे बोलल्याचे ते म्हणाले.विद्यार्थिनी - नाही मॅम, काहीच नाही. उगाच ते तुम्हाला म्हणत आहेत. मी फक्त सरांना म्हटले, तुम्हाला बोलायचे आहे. तुम्हाला काॅलेजला भेटायला येते उद्या. एवढेच बोलले.प्राध्यापिका - सर, मला म्हटले रात्री घरी येतो. तुम्ही त्यांना सांगा, आणून द्या.विद्यार्थिनी - किती वाजता येतील मॅम सर?प्राध्यापिका - ते त्यांच्या सोयीने येतात. आठ साडेआठ वाजता येतील. सर विचारत होते, मॅडम हा माझ्या तुमच्यातील विषय आहे. तो विद्यार्थ्यांपर्यंत जात तर नाही ना?विद्यार्थिनी - सर सर्वच विद्यार्थ्यांसोबत असे करतात का ?प्राध्यापिका - हो, अरे मी गेले आहे ना त्यांच्याकडे व्हायवा घ्यायला. मला माहिती आहे ना. ते काय करतात. म्हणून मी तुम्हाला पूर्ण सांगितले नाही. कारण ते तुमचे गाईड आहेत. एवढंच म्हटलं, बाई देऊन टाका त्यांना व्हायवाच्या वेळी वाटल्यास मी त्यांना विनंती करेल. तर तू ऐकायला तयार नाही. कालपासून मला अडवून ठेवलंस, झुलवत ठेवलं म्हटलं तरी चालेल.विद्यार्थिनी - मॅडम आम्हाला तेच चांगले वाटले नाही. तुम्हाला का त्रास आमच्यामुळे. म्हटलं थेट डील करावी.प्राध्यापिका - पण, सर मला यात समाविष्ट करत आहे. कारण ते दुसऱ्यांवर भरवसा ठेवत नाहीत. मी तुम्हाला सांगत आहे. किंतु परंतु न करता त्यांना तुम्ही पैसे द्या. माझ्यावर तरी विश्वास ठेवा तुम्ही.विद्यार्थिनी - ते जर सारखेच पैसे मागत राहिले तर...प्राध्यापिका - असा कसा मागेल सारखा पैसे? मी त्यांचा नरडा नाही पकडणार का? शेवटी व्हायवाच्या वेळी तो तुम्हाला म्हणेल.विद्यार्थिनी - त्यावेळी आम्हाला किती पैसे द्यावे लागेल?प्राध्यापिका - हीच रक्कम असेल.विद्यार्थिनी - २५ हजार रुपये?प्राध्यापिका - हो, एखाद्या वेळेस मी त्यांना विनंतीही करेल, की घेऊ नका म्हणून पैसे. मी तुझी वाट बारा वाजेपासून बघते आहे. तू बोलल्याचे मला वाईट वाटले.विद्यार्थिनी - साडेचार वाजता येऊ का?प्राध्यापिका - पाच वाजता या. तुझ्यावर शंभर टक्के विश्वास ठेवते. तू मला पाच वाजता इथे पैशांसोबत पाहिजे. माझे पतीचे त्याच्याशी चांगले संबंध आहे. त्याचा मी कान पकडून त्याला झापू शकते. अन् तू मला एकदम म्हटली की मी काही देऊ शकत नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी