लिंबेजळगाव : शेतात पाणी भरत असताना शाॅक लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. जिकठाण शिवारातील शेतात गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून, यात सतीश बाळकिसन बोडखे (३०, रा. जिकठाण, ता. गंगापूर) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
जिकठाण शिवारातील आपल्या शेतात सतीश बोडखे हे पाणी भरत असताना त्यांना अचानक विजेचा शाॅक लागल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना उपचारार्थ कडुबाळ हरिश्चंद्र रोकडे यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डाॅक्टरांनी सकाळी साडेसहाच्या दरम्यान मयत घोषित केले.
या घटनेची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल विजय जारवाल करत आहेत. दरम्यान, मयत सतीशवर दुपारी जिकठाण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.
---फोटो - मयत सतीश बाळकिसन बोडखे