गोवर्धन भोसले हे रांजणगावात कुटुंबासह राहतात. सोमवारी (दि. १०) रात्री जेवण झाल्यावर ते घराच्या छतावर गेले होते. छतावरून डोकावताना तोल गेल्याने ते खाली कोसळले. पडल्याचा मोठा आवाज झाल्याने त्यांचा भाऊ बापू भोसले व शेजाऱ्यांनी धाव घेतली. रांजणगाव ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मंगळवारी रात्री १ वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोना. वसंत जिवडे हे पुढील तपास करीत आहेत.
फोटो क्रमांक- गोवर्धन भोसले (मयत)
----------------
किरकोळ कारणावरून पती-पत्नीस मारहाण
वाळूज महानगर: किरकोळ कारणावरून पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. १०) रात्री ८ वाजेच्या सुमारास कमळापूर शिवारातील आसाराम बापूनगरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश लक्ष्मण निकम (४०) हे कुटुंबासह कमळापूर-जोगेश्वरी परिसरातील आसाराम बापूनगरात राहतात. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते घराच्या बांधकामावर पाणी मारत होते. तेव्हा त्यांचे शेजारी बाबासाहेब रोकडे यांनी त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे सांगत तुमच्या मुलाने घेतला का, अशी विचारणा केली होती. निकम यांनी रोकडे यांनी याचा इन्कार केला. रात्री ८ वाजता शेजारी भाऊसाहेब कटक यांच्या वडिलांना रोकडे यांचा मोबाईल सापडल्याने त्यांनी मोबाईल आमच्या घराजवळ कोणी ठेवला, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यातून रोकडे कुटुंबीयांनी निकम कुटुंबीयांस शिवीगाळ केली. या वादात रोकडे यांचे नातेवाईक सोनू नाडे, विष्णू हारणे या दोघांनी गणेश निकम यांना बेदम मारहाण केली. रोकडे यांनी लाकडी बल्ली निकम यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. निकम यांची पत्नी मध्यस्थीसाठी आली असता, रोकडे यांच्या पत्नीने त्यांना मारहाण केली.
--------------------