औरंगाबाद : समाजमाध्यमाच्या मोहजाळात दोन जीव असेच ओढले गेले. ती दहावीत, तर तो बी. कॉम. फायनलला. टिकटॉक नावाच्या सोशल मीडियावर त्यांचं प्रेम जुळलं अन् ती त्याच्या भेटीसाठी थेट कोलकात्याहून औरंगाबादेत आली. मात्र ती समोर दिसताच मॅकेनिक तरुणाने धूम ठोकली.सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे पुढे मैत्री अन् प्रेमात रुपांतर झाले. मग त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी ती थेट कोलकात्याहून औरंगाबादला आली. ती असे काही धाडसी पाऊल उचलेल, असे त्याला वाटले नाही. मात्र, जेव्हा ही परिस्थिती सत्यात उतरली तेव्हा त्याने गावी जाणे पसंत केले. पुंडलिकनगर पोलिसांनी मुलीच्या नातेवाईक आणि कोलकाता पोलिसांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले आणि तिला त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सांगितल्यानुसार हे ऑनलाईन युगुल टिकटॉक बंद झाल्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर भेटू लागले. त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक दिले, घेतले. ते व्हॉट्सॲपवर चॅटिंग करू लागले. व्हिडिओ कॉल करून संवादही साधत. आई रागावल्याने २० नोव्हेंबरला ती १७ हजार रुपये घेऊन घराबाहेर पडली.
पश्चिम बंगालहून औरंगाबादचा प्रवासn हावडा रेल्वे जंक्शन येथून संबंधित मुलगी रेल्वेने नागपूरला आली. तेथून अकोला व मंगळवारी थेट औरंगाबादेत पोहोचली. n प्रवासात ती फोनवरून सतत त्याच्या संपर्कात होती. ती खरेच औरंगाबादला येईल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. n परंतु हे स्वप्न सत्यात उतरत असल्याचे पाहून तो घाबरला. काय करावे हे न सुचल्याने तो तिला न भेटताच गावी निघून गेला.