फिर्यादीनुसार १६ वर्षे २ महिने वय असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीचे कुटुंब सुरेवाडी येथे राहत असताना गल्लीतील रोहित मस्के याच्याशी तिची ओळख झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एके दिवशी रोहित याने वाढदिवसाच्या निमित्ताने त्या मुलीस आपल्या घरी बोलावून घेतले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आपण लग्न करणारच आहोत असे म्हणत त्याने तिच्याशी वारंवार संबंध ठेवले. दिवाळीनंतर मात्र त्या मुलीने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईसह त्या मुलीने पोलीस ठाणे गाठले व रोहित विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत रोहितला त्याच्या घरी जाऊन अटक केली व न्यायालयात हजर केले. सरकारी वकील राजू पहाडीया यांनी आरोपीची सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने रोहित याला ८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:05 AM