औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या तरुणांना मारहाण करून त्यास लुटणाऱ्या तरुणाला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे ६० ते ७० तरुणांनी सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुंडगिरी करणाऱ्या तरुणांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा सुरू आहे.भाग्यनगर येथील एका स्पर्धा परीक्षा केंद्र्र आणि अभ्यासिकेत ग्रामीण भागातील अनेक तरुण अभ्यास करतात. या तरुण, तरुणींना एकटे गाठून त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करीत लुटणे आणि मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढले होते. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या तरुण, तरुणींनी सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालय गाठून तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी क्रांतीचौक पोलिसांना याप्रकरणी संबंधित गुन्हेगारावर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करून आरोपी विशाल विष्णू म्हस्के (२७, रा.भाग्यनगर) यास अटक केली. पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर म्हणाले की, एका तरुणाला विशालने मारहाण केली होती. याप्रकरणी त्यास अटक केली. त्यानंतर त्यास जामीन झाला असून, आता त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
विद्यार्थ्यावर हल्ला करणारा तरुण अटकेत
By admin | Published: May 26, 2016 12:02 AM