छत्रपती संभाजीनगर: जिल्हा विकास समन्वय समितीच्या बैठकीत मंत्री अब्दुल सत्तार अभियंत्यावर चांगलेच भडकले. विकास कामे होत नसल्यामुळे सत्तार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास तुमचे काम फक्त पैसे कमविण्याचे आहे, अशा शब्दात झापले. यामुळे बैठकीत वातावरण चांगलेच गरम झाले होते.
केंद्राच्या विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार इम्तियाज जलील , विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. यात विकास कामावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची खरडपट्टी काढली. जिल्ह्यातील आणि सिल्लोड मतदार संघातील कामे होत नसल्यामुळे सत्तार संतप्त झाले होते. विकास कामे कोणतेही नियोजन न करता अंदाजे सुरु असतात. फक्त कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी तुम्ही काम करता ? असा सवाल सत्तारांनी केला. तसेच लोकप्रतिनिधींनी , मंत्र्यांनी फोन करून देखील काम पूर्ण होत नाहीत. तुम्ही फक्त पैसे कमविण्याचे काम करता अशा तीव्र शब्दात सत्तार यांनी अभियंत्याला झापले.
काय म्हणाले मंत्री सत्तार''मी स्वः फोन केला, केंद्रीय मंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केला, तरीही काम होत नाही. कोणाला बोलयाचे आम्ही ? तुमची काम करण्याची पद्धत चुकीची आहे. राज्यातील, केंद्रातील मंत्री बोलून देखील परिणाम होत नाही. सर्व कामे अंदाजे सुरु आहेत. पुढील वीस ते तीन वर्षांचे नियोजन नाही. सर्वकाही अंदाजे सुरु आहे. तुमच्या कामात घोळ आहे, फक्त पैसे कमविण्याचे काम करतात.''