औरंगाबाद : आमच्या जागेवरच अतिक्रमण करून आम्हालाच मारहाण केली. याची तक्रार पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर पोलिसांनीही आम्हाला मारहाण करून दमदाटी केली. त्यामुळे आम्ही हतबल झालो आहोत, अशी व्यथा एका प्राध्यापिकेने पोलीस महासंचालकांसमोर रडत-रडत मांडली. सुलभा सोळंके, असे त्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे. पोलीस उपअधीक्षक नीलेश मोरे यांनी काकांसह मलाही मारहाण केली. यानंतर वडिलांवर तसेच भावावर खोटा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली. पर्स व मोबाईल चोरी झाली असतानाही मोरे यांनी जबरी चोरीऐवजी चोरी गेल्याची तक्रार देण्यास भाग पाडल्याचा आरोप प्राध्यापिकेनेकेला.त्यांनी महासंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, अंबाजोगाईच्या सावतामाळी चौकातील राहत्या जागेवर काही जणांनी अतिक्रमण केले. त्यांना विरोध केल्याने त्यांनी वारंवार प्राणघातक हल्ले केले.रविवारी काही जणांनी सोळंके व त्यांच्या काकांना अडवून मारहाण केली. मोबाईल व पर्स हिसकावून वीस हजार रुपये घेतले.यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर पोलीस उपअधीक्षक नीलेश मोरे यांनी काकांसह मलाही मारहाण केली. वडिलांवर तसेच भावावर खोटा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली. या प्रकरणात हल्लेखोरांवर कारवाई करावी, पोलीस उपअधीक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्राध्यापिकेने रडत रडतच महासंचालकांकडे केली.
प्राध्यापिकेने रडत-रडत मांडली आपली व्यथा
By admin | Published: February 16, 2016 11:55 PM