लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : सुशिक्षित बेरोजगारास जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिकाचे बनावट नियुक्तीपत्र देण्याच्या प्रकरणात भोकरदन येथील मोरेश्वर महाविद्यालयाचा प्राध्यापक डॉ. पंढरीनाथ रोकडे यास हसनाबाद पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. याबाबत ज्ञानेश्वर मिसाळ यांनी पोलिसात तक्रार दिली होती.रोकडे याने प्रभू मिसाळ यास जालना जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिकाची नोकरी लावून देतो, म्हणून ५ लाख रुपये घेतले. त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र दिले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रभू मिसाळ याने रोकडे विरुद्ध शनिवारी रात्री हसनाबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पथकासह जाऊन रोकडे यास ताब्यात घेतले. रोकडे याला हसनाबाद पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास २ दिवस पोलीस कोठडी सुनावली.हसनाबाद ठाण्यात नऊ सप्टेंबरला सरकारी नोकरीची बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवणूक करणाºया करणाºया पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल आहे. यातील चार आरोपी अटकेत आहेत तर एक फरार आहे. त्यामुळे भोकरदन तालुक्यात असे रॅकेट कार्यरत असण्याची चर्चा आहे.
तरुणाची फसवणूक, प्राध्यापकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:13 AM