शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

गरिबी व आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By admin | Published: December 19, 2015 11:55 PM

औरंगाबाद : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व गुडघ्याच्या जुन्या आजाराच्या नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

औरंगाबाद : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व गुडघ्याच्या जुन्या आजाराच्या नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नारेगावच्या माणिकनगर भागात शनिवारी दुपारी ही घटना घडली. अजय बन्सीसिंह चव्हाण (३६, रा. माणिकनगर, नारेगाव) असे मयताचे नाव आहे. तो अविवाहित होता. तो आईसह नारेगावात राहत होता. त्याचा भाऊ चिकलठाणा एमआयडीसीमध्ये कामाला आहे. याबाबत एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलीस नाईक एस. जे. भागडे यांनी सांगितले की, मृत अजयचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यात त्याच्या गुडघ्याला मार लागला होता. यामुळे त्याला अडचणी येत होत्या. हाती काम नसल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक बनली होती. गुडघ्याचा आजार व गरिबीमुळे तो सतत तणावात राहत असे. शनिवारी दुपारी आई बाहेर गप्पा मारत असताना अजयने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती त्याचा भाऊ राजेंद्र चव्हाण यांना फोनवरून सांगण्यात आली. ते आल्यावर त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांची टू मोबाईल जीप घटनास्थळी पोहोचल्यावर जमावाच्या मदतीने मृतदेह खाली उतरविण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घर हडपण्याचा प्रयत्न औरंगाबाद : बनावट पावत्या तयार करून व अपंगपणाचा फायदा घेऊन अशोक मुगदल (रा. भगतसिंगनगर) याने घर बळकावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार १८ नोव्हेंबर रोजी घडला. याप्रकरणी प्रल्हाद श्रीपतराव मुगदल यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने न्यायालयाचीही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.