शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

'प्रतिष्ठान' मधील युवकांची आव्हानात्मक 'जीवधन किल्ल्या'वर स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 7:22 PM

युवकांनी दोन दिवसात फत्ते केली जीवधन किल्ल्याची चढाई

ठळक मुद्देसातवाहन कालीन 'पैठण-नाणेघाट' व्यापारी मार्गावर केली भ्रमंती  

पैठण : गिरीप्रेमींना खुणावणारा आणि हौशी पर्यटकासह ईतिहास संशोधकांना आव्हान असलेला ऐतिहासिक नाणेघाट. घातक सुळक्यांची ओळख असलेला व ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जाणारा जीवधन किल्ला पैठण येथील युवकांनी दोन दिवसाच्या गिरी मोहिमेत सर केला. पैठणच्या दुर्ग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हे साहस केले असून या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. पैठण येथील दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने  दि २ व ३ नोव्हेंबर रोजी दुर्ग भटकंती व अभ्यास दौऱ्याचे आयोजन  केले होते. या मोहिमेत जीवधन किल्ला,चावंड किल्ला व पैठणचा प्राचीन व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट ची भ्रमंती करण्यात आली. 

पैठण येथील शिवाजी गाढे, बजरंग काळे, विष्णू ससाणे, आबासाहेब जाधव, केदार मिरदे, योगेश लोहारे, महेश गोंडे , राहुल जवरे, ज्ञानेश्वर नवले, आर बी रामावत यांनी ही मोहीम पार पाडली या युवकांना दुर्ग प्रतिष्ठान मुळे गिरी मोहिमेची आवड निर्माण झाली. गेल्या चार वर्षात पैठण दुर्ग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यासह कळसूबाई शिखरासही गवसणी घातली आहे. यंदा गिर्यारोहकाना आव्हानात्मक असलेला जिवधन किल्ला सर करून  नाणेघाट परिसराची भ्रमंती करत निरिक्षणे नोंदवली. दुर्गमार्गाने चालताना कधी दोराच्या सहाय्याने किल्ल्यावर चढाई करावी लागली,  गगनस्पर्शी सुळके, घनदाट जंगल, खोल दऱ्या, धोकादायक खिंडीचा सामना करत जीवधन किल्ला सर केला असे जि प कन्या प्रशालेचे शिक्षक बजरंग काळे यांनी सांगितले.

पैठण ते कल्याण सातवाहन कालीन प्राचीन व्यापारी मार्गसातवाहन कालीन पैठण ते कल्याण बंदर या व्यापारी मार्गाची नानेघाट म्हणून ओळख आहे. तत्कालीन पैठणच्या सातवाहन सम्राटांनी या नानेघाटाचा विकास करून व्यापारी व प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या नानेघाटाची भ्रमंती करून दुर्ग प्रतिष्ठान सदस्यांनी निरिक्षणे नोंदविली. सातवाहन साम्राज्याची पैठण राजधानी होती. पैठणच्या बाजारपेठेत  ग्रीक व रोमन व्यापारी रेशीम, मसाले, हीरे, माणिक व मोती यांचा व्यापार करण्यासाठी येत असत.परदेशातून येणारा सर्व माल हा कल्याणच्या बंदरा वर उतरवत आणि पुढे बैलगाड़ी, खेचरां मार्फत तो जुन्नर च्या दिशेने आणला जात.  आजही जुन्नरमध्ये नानेघाट हा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग अस्तित्वात आहे विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी नानेघाट असलेली अलिकडच्या काळातील कोणशिला तेथे बांधलेली आहे.

२ हजार वर्षापूर्वीचा कर संकलनासाठीचा दगडी रांजणकल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावर नानेघाट आहे, या नानेघाटा मधे सातवाहन राणी नागनीकेने व्यापारी आणि प्रवाश्यांच्या विश्रांति साठी लेणी कोरली होती. व्यापारी आणि प्रवाशासाठी ठीकठिकाणी पाण्याचे हौद सुद्धा खोदन्यात आलेले आहेत. दोन हजार वर्षांपुर्वीचा एक मोठा दगडी रांजण आज तिथे पहायला मिळतो. या रांजनाचा उपयोग त्या काळी कर वसुली करण्यासाठी करत असत. एका दिवसात तो रांजन नाण्यांनी भरत असे यावरूनच या घाटाला नानेघाट असे नाव पडले.अशी माहिती आर बी रामावत यांनी दिली. त्या काळी तो रांजन एका दिवसात भरत असे यावरून त्याकाळी नाणेघाट मार्गे रहदारी किती असेल याची कल्पना येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFortगडtourismपर्यटनhistoryइतिहास