शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळाले ५१८ नवीन शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 8:08 PM

पवित्र पोर्टलद्वारे निवड : मंजूर पदांच्या ९५ टक्क्यांपर्यंत शिक्षक उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी ३३६ जणांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये आणखी १८२ जणांची भर पडली आहे. इतर जिल्ह्यांतून १४० शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये रुजू झाले. त्यामुळे एकूण मंजूर पदांच्या ९५ टक्क्यांहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना आंदोलने करावी लागत होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती पूर्ण होत आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलमार्फत ३३६ शिक्षकांची नियुक्ती केली होती. काही शिक्षकांना लोकसभेपूर्वी तर काहींना निवडणुकीनंतर पदस्थापना मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा १४९ पदवीधर शिक्षकांची तर उर्दू माध्यमासाठी ३३ शिक्षकांची नियुक्ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे जिल्हाभरात नवीन ५१८ शिक्षक मिळाले आहेत. तसेच इतर जिल्ह्यांतून बदलीने आलेल्या शिक्षकांची संख्या १४० एवढी आहे. त्यात आणखी ६० ते ७० जणांची भर पडणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे नव्याने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांचा आकडा ७०० पार जाणार आहे. १८२ शिक्षक पदवीधर असल्यामुळे गणित, विज्ञान विषयाच्या अध्यापनाची चिंता कमी होणार आहे.

८ हजार १७७ शिक्षकांची पदे मंजूरजिल्ह्यातील जि.प. शाळांमध्ये एकूण ८ हजार १७७ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यातील ९५ टक्क्यांहून अधिक पदे भरण्यात आली. जिल्हा बदलीने आलेले शिक्षक रुजू झाल्यानंतर हा आकडा ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे रिक्त जागांची संख्या अत्यल्प राहणार असल्याचेही शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

आता ९ ऑगस्टला समुपदेशनपवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी ७ ऑगस्टला समुपदेशन फेरीचे आयोजन केले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हे समुपदेशन ९ ऑगस्ट रोजी जि.प. सभागृहात सकाळी १० वाजता ठेवले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा