औरंगाबाद : पावसाळा संपतो न संपतो तोच पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यास जाणवू लागल्या. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हा आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी ३ कोटी ९४ लाख रुपये निधीची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी सांगितले की, दि. १३ आॅक्टोबर रोजी हा टंचाई आराखड्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला. जिल्ह्यात टँकरची मागणी सुरू झाली आहे. ९ आॅक्टोबरपासून पैठण तालुक्यात ९ टँकर सुरू करण्यात आले आहेत. आगामी काळात ८५ टँकरची गरज भासणार आहे. त्यामुळे ८५ टँकरच्या खर्चाच्या तरतुदीसह पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढून खोली वाढविणे, हातपंपांच्या दुरुस्तीच्या खर्चाची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. पैठण तालुक्यातून टँकरची मागणी वाढत असून तेथे अजून किमान ३० टँकर लागणार आहेत. याशिवाय वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड तालुक्यांत काही ठिकाणी टँकरची गरज निर्माण होणार आहे.
जिल्हा परिषदेतर्फे ३.९४ कोटींचा टंचाई आराखडा शासनाला सादर
By admin | Published: October 22, 2014 12:31 AM