जालना : महिन्यातून एकदा होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा रद्द करण्यात आल्याने विविध विषयांना मिळणारी प्रशासकीय मान्यता आत्ता एक महिना लांबणीवर पडली आहे. परिणामी कामे मार्गी लागण्यास विलंब होणार आहे. विविध कामे रखडणार असल्याचे चित्र आहे.गुरूवारी स्थायी समितीची सभा लावल्यानंतर ती सभा घेणे हा नियम आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांना चार आणि विरोधी पक्षाचे चार आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती असे १४ जण सभेला असणे क्रमप्राप्त असते. त्यानंतर कोरम (गणपूर्ती) पूर्ण होते. त्यानंतर सभा होते. परंतु सत्ताधाऱ्यांचे सदस्य जास्त असल्याने कोणत्याही एक सदस्याला अध्यक्ष करून सभा होणे गरजचे होते. परंतु सत्ताधाऱ्यांचे सदस्य जास्त असल्याने तसे झाले नाही. त्यामुळे पटलावर येणाऱ्या विविध विषयांना सभेत मिळणारी प्रशासकीय मान्यता पुढे ढकण्यात आल्याने विविध कामे रखडणार आहेत. अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर शासनाकडून टंचाई आराखड्याचे ३९ कोटी रूपये येणे आहेत. तसेच त्यातूनही शेतकऱ्यांनी बांधकाम केलेल्या विहिरींचे पैसे शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. यावर स्थायीत चर्चा होणार होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे विविध बिले,सुध्दा प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गुरूवारी स्थायीची सभा तहकूब करण्यात आल्याने विविध विषयांवर होणारी चर्चा आणि त्यातून मिळणारी प्रशासकीय मान्यतेला एक महिन्याची वाट बघावी लागणार असल्याने विरोधी सदस्यांची नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
जि.प. स्थायी समितीची सभा रद्द
By admin | Published: July 22, 2016 12:21 AM