छत्तीसगडमधील एका गावात प्रियकर-प्रेयसीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रियकरावर चिडलेली प्रेयसी सुमारे १५० फूट उंच खांबावर चढली. कहर म्हणजे तिचे मन वळविण्यासाठी प्रियकरही खांबावर चढला.
अनिता भैना ही नवापूर गावातील महिला दोन दिवसांपासून कोडगर गावात मुकेश भैना याच्या घरी राहात होती. गुरुवारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि चिडून अनिता घराबाहेरील विजेच्या टॉवरवर चढली. मुकेश तिच्या मागे धावला, थांबविण्याचा प्रयत्नही केला; पण काही उपयोग झाला नाही. अखेर तोही टॉवरवर चढला. टॉवरवरच दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर दोघे एकत्र खाली उतरले. तोपर्यंत पोलिस आले, दोघांना पोलिस ठाण्यात नेले आणि चौकशीनंतर अनिताला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. अनिता विवाहित असून, पतीपासून वेगळी राहते आणि मुकेशच्या प्रेमात असल्याचे सांगितले जाते. गर्दीतील कोणीतरी व्हिडीओ बनविला तो आता व्हायरल होत आहे.