रायपूर : दुसऱ्या टप्प्यातील मतदानात ९५८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी २५३ उमेदवार कराेडपती आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव हे सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ४४७ काेटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. छत्तीसगड इलेक्शन वाॅच आणि ‘एडीआर’च्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांपैकी ९५३ उमेदवारांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. ५ उमेदवारांचे शपथपत्र याेग्य पद्धतीने स्कॅन झालेले नाही, असे त्यात म्हटले आहे.
केंद्रीय मंत्र्यांकडे ३० काेटींची संपत्तीकेंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांच्याकडे ३० काेटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यात दुकान, जमिन, वाहन इत्यादींचा समावेश आहे.
३७ पटीने वाढली यांची संपत्तीभरतपूरचे आमदार गुलाब कमराे यांची संपत्ती पाच वर्षांमध्ये तब्बल ३७ पटींनी वाढली आहे. गेल्यावेळी त्यांची संपत्ती ५ लाख रुपये हाेती. यावेळी त्यांनी शपथपत्रात १.८५ काेटींची संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे.
सर्वाधिक संपत्ती काँग्रेसचे टाॅप ३ - टी. एस. सिंहदेव : ४४७ काेटी- रमेश सिंह : ७३ काेटी- अमितेश शुक्ला : ४८ काेटी
कमी संपत्ती- राजरत्न उईके - ५०० रु - कांति साहू - १,०००रु- मुकेशकुमार चंद्राकार – १,५००रु