छत्तीगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एक्झिट पोलमध्ये देखील छत्तीगडमध्ये काँग्रेस जिंकेल असा अंदाज होता. परंतू, मतदारांनी तो देखील फोल ठरविला आहे. छत्तीसगड निकालावरून काँग्रेस धक्क्यात असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे.
(मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!)
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर छत्तीगडमध्ये देखील काँग्रेसला एवढा मोठा धक्का दिलाय की एवढ्यात तरी काँग्रेस पक्ष या धक्क्यातून सावरू शकणार नाहीय. बघेल यांचे सात मंत्री पिछाडीवर आहेत.
ताम्रध्वज साहू, मोहन मरकाम, कवासी लखमा, मोहम्मद अकबर, अमरजीत भगत, रुद्र गुरु, अनिला भेड़िया हे मंत्री पिछाडीवर आहेत. विजयाची आशा असल्याने मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी उमेदवारांना बंगळुरुला हलविण्यासाठी चार्टर प्लेनही बुक केले होते. बंगळुरुमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलही बुक करण्यात आले होते. परंतू, भाजपाने काँग्रेसच्या आशेवर पाणी फिरविल्याचे दिसत आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपाने ५१ जागांवर आघाडी मिळविली आहे, तर काँग्रेसने ३७ जागांवर आघाडी घेतली आहे, कधी काँग्रेस पुढे तर कधी भाजपा पुढे असा पाठशिवणीचा खेळ छत्तीसगडमध्ये सुरु आहे. परंतू आता पुन्हा भाजपाने १० जागांची आघाडी घेतली आहे.