छत्तीसगडच्या सुकमामधील ताडमेटला आणि दुलेड दरम्यान सीआरपीएफचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जबरदस्त चकमक झाल्याचे वृत्त आहे. कोबरा 206 च्या जवानांसोबत ही चकमक उडाली आहे. मीनपा येथील मतदान पार्टीला सुरक्षा देण्यासाठी जंगलामध्ये सैनिक तैनात होते. जवळपास 20 मिनिटे ही चकमक चालल्याचे समजते. या काही जवानही जखमी झाल्याचे समजते.
अनेक लक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त -कांकेर जिल्ह्यातील बांदे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीएसएफ आणि डीआरजीचा चमू मतदानासाठी एरिया डोमिनेशनसाठी जात होते. याच वेळी डीआरजीसोबत पानावरजवळ सादारणपणे 1 वाजताच्या सुमारास ही चकमक घडली. घटना स्थळावरून AK47 हस्तगत करण्यात आली आहे. संबंधित भागात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. काही नक्षलवादी जखमी अथवा मारले गेल्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमधील सुकमा येथे मतदान सुरू असतानाच, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पदेडाच्या दक्षिण भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. ही चकमक मतदानाच्या दिवशी एरिया डॉमिनेशनसाठी निघालेल्या केंद्रीय राखीव पोलिसांच्या 85 व्या कॉर्प्स आणि माओवाद्यांमध्ये झाली. जवळपास 5 ते 10 मिनिटे चाललेल्या या चकमकीत 2 ते 3 माओवादी मृतदेह घेऊन पळून जाताना दिसले. घटनास्थळी रक्त आणि ओढल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. सर्व सैनिक सुरक्षित असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
IED ब्लास्टमध्ये एक जवान जखमी -तत्पूर्वी, छत्तीसगडच्या सुकमामध्ये टोंडामरका भागात लक्षलवाद्यांनी केलेल्या IED ब्लास्टमध्ये CRPF कोबरा बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. या जवान निवडणूक ड्यूटीसाठी तैनात होता. सुकमा एसपी किरण चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती दिली.