राजनांदगाव : पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास आरोग्य सहाय्य योजनेंतर्गत गरीब नागरिकांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा दिली जाईल. इतर लोकांवर ५० हजारांऐवजी ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातील. शेतमजुरांना ७ हजार रुपयांऐवजी १० हजार रुपये प्रतिवर्ष दिले जातील, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राजनांदगाव येथे दिले.
राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस सरकार गरीब, मजूर, शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासी आणि दलितांचे सरकार आहे, जे त्यांच्या हृदयाचे ऐकते. आम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐकतो. आज सकाळी मुख्यमंत्री बघेल आणि मी काही शेतकरी आणि मजुरांशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितले की, ७ हजार (राजीव गांधी भूमिहीन शेतमजूर न्याय योजनेंतर्गत दिलेली रक्कम) ही रक्कम कमी आहे. आम्ही गाडीत बोललो आणि ठरवले की आता ही रक्कम १० हजार रुपये केली जाईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.