शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कलावंतांना मानधन व घरकुल द्या; अन्यथा मंत्रालयासमोर गोंधळ-जागर

By साहेबराव हिवराळे | Published: May 21, 2023 9:24 PM

महाराष्ट्र बैठकीत निघाला सूर : कोरोनात हाल; सध्याही नाही हाती जगण्याचे साधन

छत्रपती संभाजीनगर : कलावंतांना त्यांच्या कला सादरीकरणास वाव दिला तर त्यांची कुटुंबे उभी राहतात, अन्यथा त्यांना रोजंदारीवरही कुणी कामाला नेत नाहीत, त्यामुळे शासनाने मानधन तसेच घरकुलाची योजना राबवावी, अन्यथा कलावंत मंत्रालयासमोर गोंधळ-जागर आंदोलन करून व्यथा मांडणार असल्याचा इशारा रविवारी महाराष्ट्रस्तरीय बैठकीत छत्रपती संभाजीनगरात देण्यात आला.

मौलाना आझाद संशोधन केंद्रात महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्रातील कलवंतांच्या दिशादर्शक बैठक रविवारी झाली. यात मार्गदर्शन करताना प्रदेश अध्यक्ष सोमनाथ गायकवाड म्हणाले की, कलावंतांचे सर्वत्र हाल असून, त्यांना जीवन जगताना चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दाखवावे लागते. परंतु त्या तुलनेत त्यांच्या पदरी काही पडत नाही. राहण्यापासून ते कलाची साधन सांभाळताना होणारी तारेवरची कसरत जीवघेणी ठरत आहे. बहुतांश कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. कला सादरीकरणाच्या वेळेत त्यांच्या हक्काची जाणीव कुणी करून देत नाहीत. त्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभारणार आहोत. त्यासाठी कलावंतांनी साथ देण्याची गरज आहे, असेही सोमनाथ गायकवाड स्पष्ट केले. राज्यव्यापी कलावंत क्रांती परिषद, मानधनप्राप्ताची व वंचिताची यादी तयार करणे, प्रत्येक जिल्ह्यात कलावंताची नोंदणी, घरकुल व मानधन तसेच इतर कलावंताच्या प्रश्नावर आवाज उठविणे इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.

देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर यावेळी माजी सरपंच उत्तम अंबिलढगे, बबनभाई शेख, तेजराव सपकाळ,छाया नांदेडकर , मेघा डोळस, नानासाहेब कारके, ॲड. शाम खंदारे आदींची उपस्थिती होती. कडूबाई खरात, मीरा उमप या गायकांनी भीमगीताने मौलाना आझाद संशोधन केंद्रातील वातावरण प्रफुल्लित केले होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही गायकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम अंबिलढगे यांनी केले, तर मान्यवरांची स्वागत छाया नांदेडकर यांनी मानले.कॅप्शन... मौलाना आझाद संशोधन केंद्रात महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्रातील कलावंतांच्या दिशादर्शक बैठकीत कडूबाई खरात, मीरा उमप या गायिकांनी भीमगीत गायन करताना.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद