गौरेला – छत्तीसगडच्या गौरेला जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. इथं एक महिला तिच्या प्रियकरापासून दूर जाण्याच्या भीतीने एका हायटेंशन टॉवरवर चढली. बऱ्याच वेळ तिला समजवून खाली उतरवण्यात यश आले. परंतु ही महिला ज्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती तो तिच्याच पतीच्या आत्याचा मुलगा निघाला असल्याचे समोर आले.
जिल्ह्यातील नेवरी गावातील महिला अनिता हिचं ६ वर्षापूर्वी मोठ्या धुमधडाक्यात लग्न झाले होते. लग्नाच्या ४ वर्षापर्यंत पती-पत्नीत सर्वकाही ठीक चाललं होते. त्यांना १ मुलगा होता. परंतु काही काळाने या दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. ही महिला पती आणि मुलाला सोडून गौरेला येथील तिच्या घरी परतली. याठिकाणी एका दुकानात महिला काम करून उदरनिर्वाह करू लागली. त्यावेळी तिची ओळख राजमिस्त्रीसोबत झाली. दोघांमध्ये ओळख झाली आणि त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही कोडगार गावात राहू लागले. सर्व सुरळीत होते. त्या दोघांना लवकर लग्न करायचे होते.
परंतु या दोघांच्या प्रेम कहाणीत ट्विस्ट आला. जेव्हा हे दोघे एकमेकांचे वहिणी-दीर असल्याचे समोर आले. महिलेचा प्रियकर हा पतीच्या आत्याचा मुलगा होता. त्यामुळे पुन्हा एकदा आपण एकटे पडतोय या भीतीने ती त्रस्त झाली. या गोष्टींवर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर आत्महत्येच्या विचाराने हायटेंशन टॉवरवर ही महिला चढली. महिला म्हणाली की, आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. कुठल्याही परिस्थितीत वेगळे व्हायचे नाही. सत्य समजल्यानंतर नातेवाईक आणि गावकरी दोघांना वेगळे करतील. कारण ती आधीच विवाहित आहे. त्यामुळे ती टॉवर चढली.
तर मी तिला रागात ओरडलो होतो. त्या रागात ती टॉवरवर चढली. मी तिला वाचवण्यासाठी टॉवरवर चढलो होतो. तिला समजावल्यानंतर ती खाली उतरली. त्यानंतर प्रियकराने महिलेला तिच्या घरी सोडतो म्हटलं परंतु तिला घरी जायचे नव्हते. जानेवारीपर्यंत काम केल्यानंतर काही पैसे कमावता येतील त्यानंतर अनिताशी लग्न करू असं युवकाला वाटत होते. परंतु ती नात्याने त्याची वहिनी लागते असं त्याला माहिती नव्हते. याआधी कधीही तो त्यांच्या घरी गेला नव्हता. काही दिवसांपूर्वीच ही बाब प्रियकर युवकाला कळाली.