महादेव ॲपच्या प्रवर्तकांनी CM भूपेश बघेलांना 508 कोटी रुपये दिले, ED चा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 09:06 PM2023-11-03T21:06:50+5:302023-11-03T21:07:43+5:30
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने मोठा दावा केला आहे.
Mahadev Sattebaji App Case: महादेप बेटिंक अॅफच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक दावा अंमलबजावणी संचालनालयाने(ED) शुक्रवारी (3 नोव्हेंबर) केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ईडीने छत्तीसगडमध्ये विविध ठिकाणी छापे टाकून कोट्यवधीची रक्कमही जप्त केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी (2 नोव्हेंबर) ईडीने छत्तीसगडमध्ये महादेव बेटिंग अॅप प्रकरणात 5 कोटी 39 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. यामध्ये 15.59 कोटी रुपयांचा बँक बॅलन्सही गोठवण्यात आला.
"On Nov 2, Directorate of Enforcement (ED) received intelligence input that a large amount of cash is being moved in Chhattisgarh by the promoters of Mahadev APP in relation to Assembly Elections scheduled on 7th & 17th of November, 2023. ED conducted searches at Hotel Triton and… https://t.co/fmcV3TlRYkpic.twitter.com/HHokYbv95I
— ANI (@ANI) November 3, 2023
टीएस सिंहदेव यांचा भाजपवर निशाणा
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आम्हाला याची अपेक्षा होती, यासाठी आम्ही तयार होतो. हे लोक (भाजप) निवडणूक हरत आहेत, त्यामुळेच असे आरोप केले जात आहेत.
भाजप काय म्हणाले?
ईडीच्या दाव्यावर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमण सिंह यांनी भूपेश बघेल यांच्यावर महादेव अॅपला मदत केल्याचा आरोप केला आहे.
ईडीने काय म्हटले ?
ईडीने निवेदनात म्हटले आहे की, “असीम दासची चौकशी, त्याच्याकडून जप्त केलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी आणि महादेव नेटवर्कमधील एक प्रमुख आरोपी शुभम सोनी याने पाठवलेल्या ईमेलच्या तपासणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नियमित पेमेंट केले गेले आहे आणि आतापर्यंत महादेव अॅपच्या प्रवर्तकांनी भूपेश बघेल यांना सुमारे 508 कोटी रुपये दिले आहेत," असे ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या अभिनेते-अभिनेत्रींचीही नावे
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात ईडीने अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. यामध्ये रणवीर कपूर, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी, हिना खान आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांच्यासह अनेक लोक आहेत.