छत्तीसगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; भाजपकडून निवडणुकीसाठी सर्व ९० जागांचे उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:48 AM2023-10-26T10:48:50+5:302023-10-26T10:49:28+5:30

सर्व जागांवर नवे चेहरे उतरवण्यात आले आहेत.

opportunities for new faces in chhattisgarh bjp announced candidates for all 90 seats | छत्तीसगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; भाजपकडून निवडणुकीसाठी सर्व ९० जागांचे उमेदवार जाहीर

छत्तीसगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; भाजपकडून निवडणुकीसाठी सर्व ९० जागांचे उमेदवार जाहीर

रायपूर : छत्तीसगडमधील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उर्वरित चार जागांसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या चारपैकी एकाही जागेवर पक्षाने विद्यमान आमदाराला तिकीट दिलेले नाही. चारही जागा अनारक्षित प्रवर्गातील असून, सर्व जागांवर नवे चेहरे उतरवण्यात आले आहेत.

भाजपने सर्व ९०  मतदारसंघांसाठीचे उमेदवारही जाहीर केले. ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान तर  ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

दोघांचे तिकीट कापले

पक्षाने १३ पैकी दोन विद्यमान आमदारांना तिकीट दिलेले नाही. सत्ताधारी पक्ष काँग्रेसनेही सर्व ९० जागांसाठी उमेदवार जाहीर केले. काँग्रेसने २०१८ मध्ये ६८ जागा जिंकून सत्ता स्थापन केली.

 

Web Title: opportunities for new faces in chhattisgarh bjp announced candidates for all 90 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.