रायपूर : छत्तीसगडमधील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उर्वरित चार जागांसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या चारपैकी एकाही जागेवर पक्षाने विद्यमान आमदाराला तिकीट दिलेले नाही. चारही जागा अनारक्षित प्रवर्गातील असून, सर्व जागांवर नवे चेहरे उतरवण्यात आले आहेत.
भाजपने सर्व ९० मतदारसंघांसाठीचे उमेदवारही जाहीर केले. ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
दोघांचे तिकीट कापले
पक्षाने १३ पैकी दोन विद्यमान आमदारांना तिकीट दिलेले नाही. सत्ताधारी पक्ष काँग्रेसनेही सर्व ९० जागांसाठी उमेदवार जाहीर केले. काँग्रेसने २०१८ मध्ये ६८ जागा जिंकून सत्ता स्थापन केली.