रायपूर : आदिवासी नेते आणि छत्तीसगडचे माजी मंत्री अमरजीत भगत यांना नुकताच आयकर विभागाच्या छाप्यांचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणूक समोर येत असल्याने लक्ष्य करून बदनामी करण्यात येत आहे. आयटी अधिकारी पाठवून छळ करण्याऐवजी त्यांनी (भाजपने) आम्हाला थेट गोळ्या घालाव्यात, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
भगत म्हणाले, मी आदिवासींच्या हक्कांसाठी लढतो आणि तुरुंगात जाणार आहे. त्यांनी आयकर विभागाच्या धाडी टाकण्याऐवजी मला गोळ्या घालाव्यात. राहुल गांधींच्या यात्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपकडून केंद्रीय संस्थांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.