१५... देवलापार... जोड
By admin | Published: February 16, 2015 9:12 PM
केंद्रप्रमुख शाळेच्या परिसरात कुठेही दिसत नसल्याने नागरिकांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत शाळेत बोलावून घेतले. त्या शाळेत हजर झाल्या. मात्र, त्यांनी कुणालाही खोलीचे कुलूप उघडू दिले नाही. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर देवलापार पोलिसांना सूचना देण्यात आली. देवलापारचे ठाणेदार हंसराज उंदिरवाडे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनीच्या शाळेत पोहोचले. त्यांनी सदर केंद्रप्रमुखाला खोलीचे कुलूप उघडण्याची सूचना केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेचे पालन करीत केंद्रप्रमुखाने कुलूप उघडले आणि त्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. सदर केंद्रप्रमुखाच्या सेवानिवृत्तीला सहा महिन्यांचा काळ शिल्लक असल्याने त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करू नका, अशी विनंती ग्रामस्थांनी केल्याने या प्रकरणी देवलापार पोलिसांनी कारवाई केली नाही.
केंद्रप्रमुख शाळेच्या परिसरात कुठेही दिसत नसल्याने नागरिकांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत शाळेत बोलावून घेतले. त्या शाळेत हजर झाल्या. मात्र, त्यांनी कुणालाही खोलीचे कुलूप उघडू दिले नाही. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर देवलापार पोलिसांना सूचना देण्यात आली. देवलापारचे ठाणेदार हंसराज उंदिरवाडे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनीच्या शाळेत पोहोचले. त्यांनी सदर केंद्रप्रमुखाला खोलीचे कुलूप उघडण्याची सूचना केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेचे पालन करीत केंद्रप्रमुखाने कुलूप उघडले आणि त्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. सदर केंद्रप्रमुखाच्या सेवानिवृत्तीला सहा महिन्यांचा काळ शिल्लक असल्याने त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करू नका, अशी विनंती ग्रामस्थांनी केल्याने या प्रकरणी देवलापार पोलिसांनी कारवाई केली नाही. ---------कोट------पवनी येथील शाळेत घडलेला हा प्रकार अनुचित आहे. त्यांनी सदर प्रकरणाची शहानिशा करून विद्यार्थ्यांना शिक्षा द्यायला हवी होती. मात्र, विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षा देणे योग्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची गांर्भीयाने दखल घेत त्या केंद्रप्रमुखाविरुद्ध कारवाई केली जाईल.- एन. पी. वानखेडेखंडविकास अधिकारी, रामटेक***