शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

२५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमात शासनाकडून सूचनाच नाही : उर्वरित ७५ टक्के जागांसाठीच्या प्रवेशाला मात्र सुरुवात

By admin | Published: February 02, 2016 12:15 AM

जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत बालकांच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप शासनाकडून कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत.

जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत बालकांच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप शासनाकडून कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत.
शहरातील विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्य असलेल्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश वगळता उर्वरित ७५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
मुलांना चांगली शाळा किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी अनेक पालक प्रयत्नशील असतात. त्यानुसार शासनाने आरटीई ॲक्टनुसार गरीब व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविली जाणार आहे. परंतु, त्या संदर्भात मनपा शिक्षण मंडळ व प्राथमिक शिक्षण विभागाला अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाहीत.

७५ टक्क्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
२५ टक्के प्रवेशासंदर्भात आदेश नाहीत. मात्र, शहरातील शाळांमध्ये उर्वरीत ७५ टक्के जागेचा कोटा भरण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तर प्रवेशासाठी मुलांची मुलाखत घेणे, त्यांच्या पालकांना शाळेत बोलवून डोनेशन संदर्भात माहिती देण्यात येत आहे. २५ टक्के प्रवेशासाठी पात्र असलेल्या अनेक मुलांचे पालक प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांमध्ये विचारपूस करण्यासाठी जाताहेत. परंतु, याबाबत अद्याप काहीही आदेश नसल्याचे पालकांना शाळास्तरावर सांगितले जात असल्यामुळे पालकांना प्रवेश न घेता घरी परतावे लागत असल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
इन्फो-
जानेवारी महिन्यात नाशिक येथे झालेल्या बैठकीत २५ टक्के प्रवेशासाठी पालकांनी कुठली कागदपत्रे आवश्यक आहे. याविषयी माहिती देण्यात आली होती. परंतु, ही प्रवेश प्रक्रिया केव्हापासून सुरू होईल, यासंदर्भात निर्णय दिलेला नसल्याचे मनपा शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

इन्फो-
२५ टक्के प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
० आधारकार्ड, पासपोर्ट किंवा निवडणूक ओळखपत्र, टेलिफोन बिल, घरप˜ी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी एक पुरावा.
० तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणापत्र
० जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र
० कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला.
० जन्माचा दाखला व प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्याचे छायाचित्र असावे.