शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

जिल्‘ातील ५ हजार सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती शिक्षण : ३ जानेवारीला होणार वितरण

By admin | Published: December 09, 2015 11:57 PM

जळगाव : जिल्‘ातील जि.प. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणार्‍या गरजू व होतकरू ५ हजार २५० विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना प्रत्येकी ३६० रुपये याप्रमाणे दिले जाणार आहेत.

जळगाव : जिल्‘ातील जि.प. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणार्‍या गरजू व होतकरू ५ हजार २५० विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना प्रत्येकी ३६० रुपये याप्रमाणे दिले जाणार आहेत.
जिल्हा परिषदेत शिक्षण व क्रीडा समितीची सहविचार सभा बुधवारी झाली. शिक्षण व क्रीडा समिती सभापतींच्या दालनात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी सभापती सुरेश धनके होते. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, सदस्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ पाटील, प्रभाकर महाजन व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शिष्यवृत्तीसाठी १ कोटी रुपयांची ठेवी
जि.प. प्रशासनातर्फे दरवर्षी ही शिष्यवृत्ती वितरित केली जाते. यासाठी जि.प. प्रशासनातर्फे सावित्रीबाई फुले पालक योजनेंतर्गत १ कोटी रुपयांची ठेव ठेवण्यात आली होती. त्यानुसार मिळालेल्या व्याजातून पाच हजार आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
समिती गठीत
गरजू विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी प्रत्येक जि.प. शाळेत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सूचविलेल्या नावानुसार बुधवारी झालेल्या सभेत पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
३ जानेवारीला होणार वितरण
या शिष्यवृत्तीचे वितरण ३ जानेवारीला होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिली.