शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

्रप्रभाकर फाउंडेशनच्या वतीने विनाअनुदानित शाळांना पुस्तके शिक्षक आमदारांचा पाठपुरावा : १६९ शाळांना दातृत्वाचा हात

By admin | Published: July 12, 2015 9:35 PM

सोलापूर : जिल्‘ातील १६९ विनाअनुदानित शाळांना ठाण्यातील प्रभाकर फाउंडेशनने ६ लाख रुपयांची पाठपुस्तके मोफत देऊन दातृत्वाचा हात पुढे केला़

सोलापूर : जिल्‘ातील १६९ विनाअनुदानित शाळांना ठाण्यातील प्रभाकर फाउंडेशनने ६ लाख रुपयांची पाठपुस्तके मोफत देऊन दातृत्वाचा हात पुढे केला़
रविवारी सकाळी वोरोनोको प्रशालेत पार पडलेल्या पाठ्यपुस्तक वितरण सोहळ्याला शिक्षक आ़ दत्तात्रय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृ ती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, राज्य संघटक समाधान घाडगे, मुख्याध्यापक दादा चव्हाण, दादासाहेब इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू देशमुख, संतोष गायकवाड, शहाजी ठोंबरे, शहर अध्यक्ष सरदार नदाफ, कैलास देशमुख, सुभाष भिमणवरु, सुरेश नेलुरे आदी उपस्थित होते़
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ गुरव यांनी केले़ यावेळी आ़ दत्तात्रय सावंत यांनी विनाअनुदानित शाळांसाठी सेवाभावी संस्थांनी दातृत्वाचा हात पुढे करण्याचे आवाहन केले़
१६९ विनाअनुदानित शाळांना पुस्तके
सोलापूर जिल्‘ात १६९ विनाअनुदानित शाळा आहेत़ या शाळांमधून ग्रामीण भागातून साधारण २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळांना शासनाक डून कोणत्याही प्रकारचेही अनुदान मिळत नाही़ तसेच शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना, मोफत पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, परंतु प्रभाकर फाउंडेशनच्या माध्यमातून या शाळांसाठी पुस्तके उपलब्ध झाल्याने त्यांना दिलासा मिळाला़ यासाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून विनाअनुदानित शाळांसाठी पुस्तकांची मागणी करण्यात आली होती, परंतु जिल्हा परिषदेने असमर्थता दर्शवली होती़ अशावेळी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी निरनिराळ्या संस्थांना भेटून पुस्तकांची मागणी केली होती़ आमदारांच्या प्रेरणेने पुस्तके मिळाली़
------------------------------
फोटो - १२ पुस्तक वाटप
प्रभाकर फाउंडेशनच्या वतीने विनाअनुदानित शाळांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली़ याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत़ डावीकडून जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, समाधान घाडगे आदी़