खासगी शाळांच्या शिक्षक भरतीसाठी सीईटी घेणार संस्थाचालकांच्या मनमानी भरती प्रक्रियेला बसणार चाप
By admin | Published: August 27, 2015 11:45 PM
पुणे: राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागांवरील भरती कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट फॉर द टीचर (सीआरटीटी) च्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सोईच्या उमेदवारीच्या नियुक्तीसाठी संस्थाचालकांकडून केल्या जाणा-या मनमानीला चाप बसणार आहे.तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणा-या गुणवता धारक उमेदवारांनाच या पुढील काळात शासकीय व खासगी शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.येत्या नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात सीआरटीटी परीक्षा घेवून खासगी शिक्षक भरतीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
पुणे: राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागांवरील भरती कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट फॉर द टीचर (सीआरटीटी) च्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सोईच्या उमेदवारीच्या नियुक्तीसाठी संस्थाचालकांकडून केल्या जाणा-या मनमानीला चाप बसणार आहे.तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणा-या गुणवता धारक उमेदवारांनाच या पुढील काळात शासकीय व खासगी शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.येत्या नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात सीआरटीटी परीक्षा घेवून खासगी शिक्षक भरतीला सुरूवात होण्याची शक्यता आहे.नागपूर उच्च न्यायालयात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या भरती बाबत जनहित जाचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने शासनाच्या अर्थ सहाय्याने चालणा-या राज्यातील खासगी व्यव्स्थापनाचामधील शिक्षक व शिक्षकेत कर्मचा-यांच्या नेमणूका गुणवत्तेनुसार करण्याचे धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व खासगी शाळांमधील शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांचा आढावा घेतला जाणार आहे. खासगी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीच्या परीक्षेसाठी विषय निहाय अभ्यासक्रम निश्चित केला जाणार आहे. प्राथमिक शिक्षक भरतीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून तर माध्यमिक शिक्षकांच्या भरतीचा अभ्यासक्रम राज्य मंडळाकडून निश्चित केला जाणार आहे.राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेच्या नियोजनाची कालबध्द रुपरेषा आखण्यात आली आहे.राज्य शासनाचे शिक्षण विभागासाठी एक ते दहा प्राध्यान्य निश्चित केले आहे.त्यात शिक्षकांची नियुक्ती केंद्रीय निवड पध्दतीने करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे केवळ शासकीयच नाही तर खासगी शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती सुध्दा केंद्रीय निवड पध्दतीने होणार आहे. सध्या संस्थाचालकांकडून केल्या जात असलेल्या भरतीतून काहीवेळा गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलले जाते. तसेच शैक्षणिक दृष्ट्या अपात्र असणा-या व सामाजिक आरक्षण डावलून काही उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या जातात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासनाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारचीच शिक्षक पदी नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे टीईटी पात्र उमेदवारांचीच सीआरटीटीमधून खासगी शिक्षक पदासाठी निवड होणार आहे. इंग्रजी माध्यामाच्या शाळांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार शिक्षक म्हणून काम करत आहेत.त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.सीईटी किंवा सीआरटीटीच्या माध्यमातून शिक्षकांची निवड झाली तर शैक्षणिक दर्जा उंचावणार आहे.मात्र,काही संस्थाचालक या धोरणाच्या विरोधात पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्तता व्यक्त केली जात आहे.