सुख दुखाच्या प्रसंगाला सामोरे जा- सपकाळ
By admin | Published: July 16, 2015 3:56 PM
मुदखेड: फुलातून चालताना काटे येतील, विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार करावा. जीवनातील सुख दुखाच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी मुदखेड येथे केले.
मुदखेड: फुलातून चालताना काटे येतील, विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार करावा. जीवनातील सुख दुखाच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी मुदखेड येथे केले. माजी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकररराव चव्हाण यांच्या जयंतीनिनिमत्त तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सपकाळ बोलत होत्या. यावेळी आ. अमिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी तालुकाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुनील शेटे, खुर्शीदसेठ, नारायण कोत्तावार, उद्धव पवार, मारोती किरकण, गोविंद गोपतपल्ले, शंकर राठी, डॉ. संजय मुंगल, डॉ. माणिक जाधव, डॉ. राजवाडीकर, सभापती गोणेवाड, रोहिदास जाधव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गंगाधर डांगे यांनी केले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संजय कोलते यांचा आ. चव्हाण, नागेलीकर यांनी सत्कार केला.