विद्यापीठातील ६२ बंधार्यांमध्ये ठणठणाट
By admin | Published: February 04, 2016 12:06 AM
जळगाव : भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, अशी दूरदृष्टी ठेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ परिसरात ६२ कृत्रिम बंधार्यांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, यंदा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व बंधारे कोरडठाक पडले आहेत.
जळगाव : भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, अशी दूरदृष्टी ठेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ परिसरात ६२ कृत्रिम बंधार्यांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, यंदा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व बंधारे कोरडठाक पडले आहेत. उच्च शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून बाहेरगावाहून आलेल्या व विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, म्हणून विद्यापीठात ६२ बंधारे व ४ विहीरींची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, यावर्षी विहीरीतील पाणीही आटले आहे. पाऊस नसल्याने बंधार्यांमध्येही ठणठणाट आहे. त्यामुळे विद्यापीठात राहणार्या विद्यार्थ्यांनाही पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागतोय.दीड हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सद्य:स्थितीत दीड हजार विद्यार्थी, तसेच १०४ कर्मचार्यांच्या क्वॉर्टरमध्ये विद्यापीठात काम करणारे कर्मचारी राहताहेत. परंतु, विद्यार्थ्यांचे वसतिगृह व कर्मचार्यांच्या क्वार्टरमध्ये राहणार्या कर्मचार्यांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एकदाच दिले जाते पाणी पूर्वी विद्यापीठातील बंधार्यांमध्ये समाधानकारक पाणी होते. त्यामुळे दिवसातून तीन वेळेस कर्मचार्यांचे क्वार्टर व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात दिवसातून तीन वेळेस पाणी सोडले जात होते. मात्र, आता दिवसभरातून एकदाच पाणी सोडले जात असल्याची माहिती कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी दिली आहे. २५ लाख लिटर पाणी लागते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सद्य:स्थितीत दिवसाला २५ लाख लीटर पाणी लागते. त्यात विद्यापीठात काही इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी बर्याचदा बाहेरून टॅँकरने पाणी आणावे लागत आहे. पाण्याची व्यवस्था हाच पर्याय उमवित सोमवारी पत्रपरिषद आटोपली. त्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पाण्याच्या समस्येमुळे विद्यार्थी स्थलांतरास नकार देत असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर कुलगुरू प्रा. मेश्राम म्हणाले, की पाण्यासाठी बोअरिंग केली. परंतु, पाणी लागले नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात ज्या प्रमाणे पाण्याची व्यवस्था केली आहे. तशी व्यवस्था आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे करणे आवश्यक आहे.