एग्लो उर्दू शाळेत हिंदीची कॉपी
By admin | Published: February 22, 2016 7:28 PM
जळगाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या हिंदी परीक्षेदरम्यान शहरातील एग्लो उर्दू हायस्कूल व कन्या शाळेच्या केंद्रावर कॉपीचा वापर होतांना दिसून आला.
जळगाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या हिंदी परीक्षेदरम्यान शहरातील एग्लो उर्दू हायस्कूल व कन्या शाळेच्या केंद्रावर कॉपीचा वापर होतांना दिसून आला. हिंदीचा विषय असल्याने परीक्षे दरम्यान कॉपीचा फारसा प्रकार परीक्षा केंद्रांवर जाणवला नाही. मात्र ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या मागील बाजूच्या वर्गांच्या खिडक्यातून विद्यार्थ्यांनी कॉपीची मदत घेऊन पेपर सोडविला.या ठिकाणी विद्यार्थी बिनधास्त कॉपी करतांना आढळूनआले. वर्गात बिनदिक्कत सुरु असलेला कॉपीचा प्रकार कमी करण्यासाठी एका शिक्षकानेच खिडकीमध्ये ठेवलेली कॉपी आपल्याच हाताने फेकून दिली.तर प.न. लुंकड कन्या शाळेच्या केंद्रावर काही वर्गात बिनदिक्कत कॉपी प्रकार सुरु होता. तर काही वर्गामध्ये कॉपीच चालली नव्हती. विशेष म्हणजे याच केंद्रावर बारावी परीक्षेचे कस्टडी केंद्र आहे. हिंदीचा पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षेदरम्यान फारसी काही अडचणी नसल्याचे विद्यार्थ्याकडून पेपर सुटल्याव सांगण्यात आले.इन्फोनुतनच्या सेंटरमध्ये बदल नुतन महाविद्यालयात नॅक कमिटीतर्फे मुल्यांकन करण्यात येत असल्याने. महाविद्यायातील १२ वी परीक्षेचे केंद्र २२ व २३ रोजी प.न.लुंकड कन्या शाळा व विद्यानिकेतन विद्यालयात घेण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी दिली.